You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅन्सर विशिष्ट अन्नघटकांमुळे वाढतो?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, बीबीसी आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
आपल्या जेवणातील काही अन्नघटक कॅन्सरची वाढ आणि प्रसार यावर परिणाम करतात, असं संशोधन केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलं आहे. हे संशोधन नेचर या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे. प्राण्यांवर झालेल्या या संशोधनात असं दिसून आलं आहे की स्तनांतील गाठींना अॅस्पराजीन या अन्न-घटकाशिवाय वाढणं कठीण जातं.
अॅस्पराजीन हे शतावरी, पोल्ट्री, सीफूड आणि इतरही अनेक पदार्थांत आढळतो.
कॅन्सरवरील उपचार पद्धतीत सुधारणा करण्यासाठी या संशोधनाचा वापर होईल, असं संशोधकांना वाटते.
अॅस्पॅरिजीन एक प्रकारचे अॅमिनो अॅसिड आहे. अॅस्पॅरॅगसपासून त्याला हे नाव मिळालं आहे.
प्रसार
कॅन्सर रिसर्च यूके केंब्रिज इन्स्टीट्यूटमध्ये तीव्र स्वरूपाचा स्तनांचा कॅन्सर असलेल्या उंदरावर हा अभ्यास करण्यात आला आहे. कॅन्सरग्रस्त उंदराच्या शरीरभर गाठी पसरतात आणि काही आठवड्यांतच ते मरण पावतात.
पण या उंदराला जेव्हा कमी अॅस्पॅरिजीन असलेलं अन्न आणि औषधं देण्यात आली तेव्हा त्यांच्या शरीरात कॅन्सरचा प्रसार होण्यास अडथळा निर्माण झाला.
"हा खूप मोठा बदल होता. कॅन्सर शोधणं खूप अवघडं होतं," असं प्राध्यापक ग्रेग हॅनॉन सांगतात.
सीरिन आणि ग्लायसिन हे अॅमिनो अॅसिड कमी प्रमाणात शरीरात गेल्यास लिम्फोमा आणि आतड्यासंबंधीचे कॅन्सर यांचा प्रसारात अडथळा निर्माण होतो, असं ग्लासगोव्ह विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढं आलं होतं.
बीबीसीशी बोलताना हेनॉन म्हणाले, "विशिष्ट कॅन्सर हा जेवणातल्या विशिष्ट पदार्थांशी संबंधित असल्याच्या पुराव्यांत वाढ होत आहे."
"भविष्यात रुग्णाचा डाएट व्यवस्थित ठेवल्यास तसंच त्या पद्धतीची औषधं दिल्यास कॅन्सरच्या प्रसारात आळा घालता येऊ शकतो," असं ते म्हणाले.
कॅन्सर
कॅन्सरची गाठ प्राथमिक टप्प्यावर कमी प्राणघातक असतो. पण जेव्हा कॅन्सर सर्व शरीरभर पसरतो तेव्हा मात्र घातक ठरतो. शरीरभर कॅन्सरचा प्रसार होण्यासाठी कॅन्सरच्या पेशींना प्रचंड बदलांतून जावं लागतं. याच प्रक्रियेसाठी अॅस्पॅरिजीन महत्त्वपूर्ण असल्याचं संशोधकांना वाटतं.
पण या निष्कर्षांना पुष्टी मिळणं बाकी असून अॅस्पॅरॅगस प्रेमींनी चिंता करण्याचं कारण नाही. शिवाय आहारात अॅस्पॅरिजिन टाळणं खूपच कठीण असतं, असं संशोधकांना वाटतं.
दीर्घ कालावधीकरता रुग्णांना अॅस्पॅरिजीन नसलेला संतुलित आहार द्यायला हवा, असं संशोधकांना वाटते.
कॅन्सर रिचर्स यूकेचे मुख्य तज्ज्ञ चार्ल्स स्वॅंटन सांगतात, "आश्चर्यकारक बाब म्हणजे एल- अॅस्पॅरिजिनेस हे औषध तीव्र लिम्फोबलास्टिक ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं आणि ते अॅस्पॅरिजीनवर अवलंबून असतं. भविष्यात हे औषध स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या या औषधात बदल केलं जाऊ शकतात."
यावर अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे.
"या अभ्यासाच्या आधारावर रुग्णांनी आहारात आमूलाग्र बदल करू नये," असं 'ब्रेस्ट कॅन्सर नाऊ'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नोज डेलीथ मॉर्गन सांगतात.
त्यांच्या मते, "डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय रुग्णांनी आपल्या आहारातून विशिष्ट पदार्थ वगळू नयेत. रुग्णांनी आरोग्यास पोषक आहार घ्यावा तसंच आहारात वैविध्य ठेवावं," असं ते सांगतात.
हे पाहिलं का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)