You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लालबुंद चंद्राची जगभरातली ही 12 लोभस रूपं पाहा
चंद्र ग्रहण, सुपर मून, ब्लू मून या चंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला पहायला मिळाल्या. ही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे. जगभरातील विविध ठिकाणाहून टिपलेली ही छायाचित्रं.
1. ब्रिटन
डॅनी लॉसन यांनी युनायटेड किंगडममध्ये सूपर ब्लड मूनचं घेतलेलं छायाचित्र. दिडशे वर्षांनी हा योग जगभरातील नागरिकांना अनुभवता आला.
2. माद्रिद, स्पेन
माद्रिद शहराच्या स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर मेहदी अमर यांनी टिपलेला हा ब्लड मून.
3. स्वॅलबर्ड, नॉर्वे
नॉर्वेतील स्वॅलबर्ड भागातही सूपर ब्लू ब्लड मून पहायला मिळाला.
4. न्यूयॉर्क, अमेरिका
वेस्ट हँपशायरमध्येही हा दुर्मीळ योग पहायला मिळाला. जसं की न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथं टिपलेलं हे छायाचित्र.
5. म्यानमार
एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येत असेल तर ब्लू मूनचा योग जुळून येतो. म्यानमारमधील हे नयनरम्य दृश्य.
6. सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्कोच्या स्कायलाइनशी स्पर्धा करणारा हा चंद्र.
7. कॅलिफोर्निया, अमेरिका
सूर्य अस्ताला जात असताना पश्चिम क्षितिजावर सुपर मूनचं आगमन झालं. संधिप्रकाशाचा हा खेळ अनुभवता आला कॅलिफोर्नियाच्या अवकाशात.
8. लंडन, ब्रिटन
सेंट पॉल कॅथेड्रलच्या मागील बाजूनं क्षितिजावर आलेला हा सुपर मून. लंडनमधील हे छायाचित्र.
9. बँकॉक, थायलंड
सुपरमून आणि ब्लड मूनच्या वेळीच चंद्र ग्रहणही होते. आणि बँकॉकच्या प्रसिद्ध मंदिर आणि ब्लड मून.
10. सिंगापूर
जगभरात विविध ठिकाणी ही खगोलीय घटना अनुभवता आली. सिंगापूरमध्ये अब्दुर रहमान यासीन यांनी काढलेलं हे छायाचित्र.
11. नवी मुंबई, भारत
नवी मुंबईच्या कोपरखैरणे या भागातून हे चंद्रग्रहण असं दिसलं. सर्व सामान्यांनाही अगदी सहज हे ग्रहण पाहाता येत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये उत्साह होता.
12. जकार्ता, इंडोनेशिया
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये घेतलेला चंद्राचा क्लोज-अप.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)