फोटो पाहा : ISच्या पाडावानंतर प्रथमच मोसूलमध्ये ख्रिसमस साजरा

इराकमधल्या मोसूल शहरातून कथित इस्लामिक स्टेटचा (IS) पाडाव झाल्यानंतर चार वर्षांनी प्रथमच शहरात ख्रिसमस साजरा करण्यात आला.

मोसूलच्या सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिस्ती नागरिक आणि पादरी एकत्र जमले, आणि त्यांनी पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला.

मोसूलमधील सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणारे ख्रिश्चन नागरिक

फोटो स्रोत, EPA

मोसूलवर बरेच महिने ISचा ताबा होता. म्हणून तसंच त्यांच्यात आणि इराकी लष्करात पूर्वी नियमित चकमकी उडत होत्या.

त्यामुळे ख्रिश्चनांसह इथल्या सर्वच नागरिकांना कोणताही सण-वार साजरा करणं शक्य नव्हतं होत.

या काळात अनेक ख्रिश्चन नागरिकांना अत्याचाराला समोरं जावं लागलं. कारण ISचे कट्टरतावादी बहुतांश लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचे, काहींकडून जबरी खंडणी वसूल करायचे. तर काहींची हत्याही त्यांनी केली होती.

मोसूलमधील सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणारे ख्रिश्चन नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

या वर्षी जुलैमध्ये इराकी सैनिकांनी कथित ISला मोसूलमधून पळवून लावलं. त्यानंतर काही पीडितांनी आता इराकमध्ये आपापल्या घरी परतायला सुरुवात केली आहे.

आणि यंदा तर त्यांचा पहिला ख्रिसमस आहे.

रविवारी मोसूलमधल्या सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिश्चन पादरींनी एकत्र जमलेल्या ख्रिश्चन नागरिकांसोबत प्रार्थना करत त्यांना आशीर्वाद दिले. चार वर्षांमध्ये प्रथमच या चर्चमध्ये हे धार्मिक विधी पार पडले.

त्यानंतर गेल्या महिन्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी तीन वर्षांपासून इस्लामिक स्टेटसोबत सुरू असलेल्या लढाईचा अंत झाल्याची घोषणा केली. त्यामुळे सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणे शक्य झालं.

मोसूलमधल्या सेंट पॉल चर्च्या बाहेर गस्त घालणारे जवान

फोटो स्रोत, EPA

सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा होत असताना चर्चच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसंच चर्चच्या बाहेर लष्कराच्या गाड्याही गस्त घालत होत्या. चर्चच्या खिडक्यांच्या भोवती बाँबरोधी कव्हरही उभारण्यात आले होते.

मोसूलमधील सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणारे ख्रिश्चन नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

या कॅथलिक चर्चचे लुईस राफेल साको यावेळी बोलताना म्हणाले की, "ख्रिसमस साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी इराक आणि मोसूलमध्ये कायम शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करावी."

तर कथित इस्लामिक स्टेटचा पाडाव झाल्यानंतर मोसूलमध्ये परतलेले फर्कद माल्को म्हणाले की, "मोसूलमध्ये आता ख्रिश्चनांना मोकळं वातावरण मिळणार आहे."

मोसूलमधील सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणारे ख्रिश्चन नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

सेंट पॉल चर्च हे मोसूलमधले एकमेव चर्च असल्याने ख्रिसमस साजरा करण्यासाठी इथे ख्रिश्चन नागरिकांनी गर्दी केली होती. इस्लामिक स्टेटचा अंमल वाढण्याआधी 2014 मध्ये मोसूलमध्ये 35,000 ख्रिश्चन नागरिकांची लोकसंख्या होती.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)