यूट्यूब व्हीडिओंनी 10 वर्षीय रायन बनला कोट्यधीश

Ryan
फोटो कॅप्शन, हा आहे रायन. यूट्यूबवर त्यानं केली आहे कोट्यवधीची कमाई

रायन आता 10 वर्षांचा झाला आहे. पण, दिवसभरात तो इतकी धमाल करतो आणि त्यातून चक्क पैसे कमावतो, हे ऐकून इतरांना त्याचा हेवा वाटेल. बीबीसीनं 2017 मध्ये केलेली त्याची ही स्टोरी पुन्हा शेयर करत आहोत.

रायनचा बँक बॅलन्स बघून तर मोठ्यांना भोवळच येईल. तो आठवड्यातून एकदा नवीन खेळ खेळतानाचा त्याचा व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड करतो. याच्या जोरावर त्यानं 2017 या वर्षात अंदाजे 70 कोटी रुपये कमावले आहेत.

त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रायन टॉयज् रिव्ह्यू. स्टार अर्थातच रायन. आणि तो या चॅनलवर एखाद्या नवीन खेळण्याचा बॉक्स उघडतो. त्या खेळण्याशी खेळतो.

फोर्ब्स या अर्थविषयक नियतकालिकाच्या माहितीनुसार, सर्वाधिक कमाई असलेल्या यूट्यूब स्टार्सच्या यादीत रायनचा क्रमांक आठवा आहे.

मार्च 2015मध्ये रायननं म्हणजे त्याच्या वतीनं पहिला व्हीडिओ अपलोड केला गेला. तेव्हापासून आतापर्यंत त्याचे व्हीडिओ जवळ जवळ 1 अब्ज लोकांनी पाहिले आहेत.

Image of the YouTube channel Ryan ToysReview
फोटो कॅप्शन, रायनच्या चॅनलला 8 कोटी लोकांनी भेट दिली आहे

लोकांना रायन आणि त्याची खेळणी इतकी का आवडतात? रायन कोण आहे, तो कुठे राहतो याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

कोण आहे रायन?

रायन यूट्यूबवर लोकप्रिय आहे. पण, त्याच्याबद्दल फारशी माहीती कुणालाही नाही. त्याचं आडनाव, तो कुठे राहतो हे गुलदस्त्यातच आहे.

रायनच्या पालकांनी पूर्वी एकदा एका माध्यमाला मुलाखत दिली होती. त्यात त्याच्या आईनं यूट्यूब व्हीडिओची कल्पना स्वत: रायनची असल्याचं म्हटलं होतं.

तीन वर्षांचा असताना ही कल्पना सुचली असं त्यांचं म्हणणं होतं.

"तो खेळ कसे खेळायचे याविषयीचे व्हीडिओ खूप बघायचा. एकदा त्यानं प्रश्न विचारला, मी असा एखादा कार्यक्रम करू का? मग आम्ही ठरवलं, हे करून बघितलं पाहिजे," असं रायनच्या आईनं ट्यूब फिल्टर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आपली स्वत:ची ओळख मात्र रायनच्या आईनं उघड केलेली नाही. तिनं ट्यूब फिल्टरला सांगितलेल्या कहाणीनुसार, "त्याची आवड आणि इच्छा बघून आम्ही त्याला खेळण्यांच्या दुकानात नेलं. त्यानं पहिलं खेळणं निवडलं ती एक लेगो ट्रेन होती. तिथून या उपक्रमाला सुरुवात झाली."

रायनची यूट्यूबवर दमदार एंट्री झाली. या व्हीडिओमध्ये रायननं एका प्लास्टिकच्या अंड्यातून शंभर खेळणी बाहेर काढली होती.

हा व्हीडिओ 80 कोटी लाख लोकांनी पाहिला.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

गेल्या वर्षी जानेवारीत त्याच्या सबक्रायबर्सची संख्या दहा लाखांच्यावर गेली. आणि पुढे ओघ सुरूच राहिला. रायन टॉईज् रिव्ह्यूचे सबस्क्रायबर्स सध्या 1 कोटीच्या घरात आहेत.

यशाचं रहस्य

बहुतेक यूट्यूब सादरकर्ते पाठांतर करून बोलतात. रायन मात्र खेळणं बघून उत्फूर्त प्रतिक्रिया देतो. काही जणांनी आम्हाला सांगितलं की, रायन हळूहळू खेळणं उघडतो. त्यात लोकांची उत्कंठा ताणून धरली जाते. अनबॉक्सिंग हेच या व्हीडिओच्या यशाचं रहस्य असल्याचे विश्लेषक सांगतात.

वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रानं एका लेखात रायनच्या यशाची मीमांसा केली आहे.

'रायनचं बोलणं ओघवतं आहे. फार तयारी करून तो बोलत नाही. त्यात दुसऱ्याला शिकवण्याचा आव नसतो आणि म्हणूनच त्याचं परीक्षण लोकांना आवडतं,' असं या लेखात म्हटलं आहे.

Ryan ToysReview
फोटो कॅप्शन, रायन व्हीडिओतून शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रयोगही सादर करतो

यूट्यूबवर अनपॅकिंग किंवा अनबॉक्सिंगचे अनेक व्हीडिओ आहेत. पण, त्यातले सादरकर्ते कॅमेऱ्यासमोर असल्यानं त्याचं भान ठेवून बोलतात. रायन मात्र कॅमेऱ्यासमोर अगदी नैसर्गिकपणे वावरतो.

'आम्ही दर दिवशी एक व्हीडिओ अपलोड करतो. कधीकधी एका दिवसात तीन व्हीडिओ चित्रित करतो,' असं त्याच्या आईनं ट्यूबफिल्टरशी बोलताना स्पष्ट केलं.

आर्थिक कमाई

रायनच्या पालकांनी हा एक व्यवसाय सुरू केला आहे. त्यात रायन भरडला जातो आहे, अशी टीका त्यांच्यावर होते.

Social networks logos

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडिया पैसे बनवण्याचं साधन बनले आहेत

त्यावर, "आम्ही त्याच्या शाळेच्या दिनक्रमात ढवळाढवळ करत नाही. चित्रिकरण आम्ही शनिवार किंवा रविवारी करतो. तो शाळेत असताना आम्ही एडिटिंग करतो," रायनच्या आईनं सांगितलं.

टॉईज्, पेट्स अँड मोअर या चॅनलचे सादरकर्ते जिम सिल्व्हर यांच्यामते यूट्यूब चॅनलमुळे खेळण्यांचा खप वाढतो.

'रायनला लहान वयात मिळालेलं यश लक्षणीय आहे. बरेच सादरकर्ते वयानं मोठे आहेत. त्यामुळे त्यांची शब्दसंपदा आणि समज रायनपेक्षा वेगळी आहे,' असं सिल्व्हर यांनी द व्हर्ज या वेबसाईटल्या दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

देणगी

रायननं ज्या खेळण्यांचं परीक्षण केलं आहे ती आम्ही विकत घेतलेली आहेत. ती आम्ही अनाथालयाला भेट देतो म्हणून देतो, असं रायनच्या आईनं स्पष्ट केलं आहे.

मागच्या काही महिन्यात खेळण्यांच्या उत्पादकांच्या लिंक दिल्या आहेत.

Toy Store

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खेळण्यांचा खप वाढतो.

सध्या रायनच्या वेबपेजवर प्रतिक्रिया पाहता येत नाहीत. त्यामुळे टीकाकारांनी नेमकं काय लिहिलंय कळत नाही.

पण, इतर काही साईट्सवर या यूट्यूब चॅनलबद्दलच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. त्या संमिश्र आहेत. आपल्या मुलांवर रायनच्या कार्यक्रमाचा झालेला परिणाम पालकांनी लिहिला आहे.

त्यातलीच एक प्रतिक्रिया आहे, 'माझा मुलगा रायन रिव्ह्यू चॅनलची पारायणं करतो.'

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)