गौरव तनेजा: युट्युबरच्या वाढदिवसाला बॉलिवुड सेलिब्रिटीपेक्षा अधिक चाहते

गौरव तनेजा, रितू, युट्यूब, इन्स्टाग्राम, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, गौरव तनेजा यांचं युट्यूब चॅनेल

प्रसिद्ध युट्यूबरने स्वत:च्या वाढदिवशी चाहत्यांना चक्क मेट्रो स्टेशनात बोलावलं. युट्यूबरच्या प्रेमापोटी शेकडो चाहते मेट्रो स्टेशनात जमले. मेट्रो स्टेशनात चाहत्यांच्या या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी युट्यूबरला अटक केली. काही तासांनंतर त्याला जामीन मिळाला.

दिल्लीजवळच्या नोएडामध्ये हा सगळा प्रकार घडला. गौरव तनेजा या युट्यूबरचे चाहते आहेत. शनिवारी गौरवचा वाढदिवस होता. वाढदिवसाला त्याने चाहत्यांना चक्क अक्वा मार्गावरच्या सेक्टर 51 मेट्रो स्टेशनात बोलावलं. गौरवला भेटता येईल याउद्देशाने शेकडो माणसं या मेट्रो स्टेशनात जमली.

चाहत्यांची संख्या वाढल्याने स्टेशनात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी गौरवला चौकशीसाठी बोलावलं. त्याला अटक करण्यात आली. काही तासांनंतर त्याला जामीन देण्यात आला असं नोएडा सेक्टर-49च्या पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गौरव आणि त्याच्या पत्नीने नोएडा सेक्टर 51 मेट्रो स्टेशनात रीतसर परवानगीने कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी त्यांनी विशिष्ट जागाही बुक केली. कार्यक्रमासाठी 200 जण उपस्थित राहू शकतील असं ठरलं. यासंदर्भात रितू यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली.

गौरव तनेजा

फोटो स्रोत, Gaurav

नोएडा मेट्रो रेल प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीइतकेच लोक कार्यक्रमाला हजर राहू शकतीस असं त्यांनी सांगितलं. आम्ही सगळ्यांना भेटू. मी हे सगळं एकटीने करते आहे, काही चूकभूल झाली तर माफ करा. तुमचं प्रेम आणि पाठिंबा मोलाचा आहे असंही त्या म्हणाल्या.

ठरलेल्या संख्येपक्षा जास्त लोक आल्याने मेट्रो स्टेशनात आणि खाली रस्त्यावर गर्दी झाली. वाहतूक कोंडीही झाली. त्यामुळे पोलिसांना याची दखल घ्यावी लागली. गौरववर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गौरवचं फ्लाईंग बिस्ट नावाचं युट्यब चॅनेल आहे. त्याचे 7 मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत. स्टार प्लसवरच्या स्मार्ट जोडी कार्यक्रमात गौरव आणि रितू हे जोडपं सहभागी झालं होतं. रितू याही व्लॉगर आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)