...म्हणूनच अनुष्का-विराटनं लग्नासाठी हे रिसॉर्ट निवडलं

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी इटलीमध्ये विवाह बंधनात अडकले. रोम आणि मिलान सारखी इटलीतली मोठी शहरं सोडून विराट आणि अनुष्कानं या रिसॉर्टचीच का निवड केली असेल? असं काय खास आहे, या रिसॉर्टमध्ये?

1. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या लग्नाचं ठिकाण शेवटपर्यंत गुप्त ठेवलं होतं. हे ठिकाण म्हणजे इटलीमधलं बोर्गो फिनोशिटो रिसॉर्ट होय.

2. हे रिसॉर्ट लग्न समारंभाच्या आयोजनासाठी जगप्रसिद्ध आणि महागड्या हॉटेलपैकी एक आहे.

3. हे रिसॉर्टमध्ये इटलीमधल्या टस्कनी परिसरात आहे.

4. 2017मध्ये अमरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कुटुंबीयांसह इथं सुटीवर आले होते.

5. मिलान शहरापासून ते 4 ते 5 तासाच्या अंतरावर आहे.

6. 800 वर्ष जुन्या गावाच्या ठिकाणी या रिसॉर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या गावाल पूर्ण नवीन लूक देण्यात आला आहे.

7. बोर्गो फिनोशिटो याचा अर्थ 'बागांचं गाव' असं आहे. हे रिसॉर्ट गावासारखं आहे. इथं सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत.

8. इटलीमधले अमेरिकेचे माजी राजदूत जॉन फिलिप्स यांनी 2001मध्ये ही जागा विकत घेऊन रिसॉर्टची निर्मिती केली आहे.

9. या रिसॉर्टमध्ये पाच व्हिला आणि फक्त 22 खोल्या आहेत. म्हणूनच विराट आणि अनुष्कानं लग्नासाठी आमंत्रितांची संख्या कमी ठेवली.

10. जेवणासोबत उत्तम वाईनसाठी ही या रिसॉर्टची खासियत आहे. या रिसॉर्टच्या आजूबाजूनं द्राक्षबागा आहेत.

हे वाचल का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)