You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाहबंधनात अडकले. इटलीतल्या टस्कनी प्रांतात हा विवाहसोहळा पार पडला.
विराट आणि अनुष्का यांनी सोमवारी संध्याकाळी ट्विटरवरून आपल्या विवाहाची घोषणा केली. या जोडीनं ट्विटरवरून हे जाहीर करण्याच्या आधीच सोशल मीडियावर #virushkawedding हा हॅशटॅग ट्रेण्डिंग होता.
इटलीतल्या बोर्गो फिनोशितो या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला असल्याची माहिती ट्विटरवरून मिळते.
गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात विराट आणि अनुष्काचे कुटुंबीय इटलीसाठी रवाना झाल्यानंतर तर या चर्चांना अजूनच उधाण आलं.
पण आज फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सर्वप्रथम विराट- अनुष्काचं लग्न झाल्याची माहिती जाहीर झाली. दरम्यान या दोघांच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो शेअर करायला सुरुवात केली होती.
सोशल मीडियवर आता #virushkawedding नावाचा हॅशटॅश ट्रेंड होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे काही फोटो शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. सोमवारी त्यांचे चाहते विवाहाची अधिकृत घोषणा कधी होते, याची आतुरतेने वाट पाहात होते.
विराट आणि अनुष्काने एकाच वेळी आपल्या ट्विटर अकाउंटवरून विवाहाची घोषणा केली. आपल्या चाहत्यांनाही या ट्वीटमधून त्यांनी धन्यवाद दिले.
विराट आणि अनुष्काच्या वतीने दिल्या गेलेल्या माहितीनुसार, दोघांचेही पेहराव सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केले होते.
जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी इटलीहून परतल्यावर दिल्ली आणि मुंबईत वेगवेगळे सोहळे होतील, असंही त्यांच्या वतीने सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलं आहे.