You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मॅनहटन बॉम्ब स्फोटप्रकरणी एकजण ताब्यात
न्यूयॉर्क शहरातल्या मॅनहटन बस स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
अकायद उल्लाह या 27 वर्षांच्या बांगलादेशी स्थलांतरित नागरिकाला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. या संशयीत आरोपीच्या शरीराला कमी क्षमतेची स्फोटकं गुंडाळलेली होती.
सबवेमध्ये झालेल्या या हल्ल्यात तीनजण जखमी झालेत. हल्ल्यानंतर कपडे फाटलेल्या स्थितीतल्या आरोपीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.
या फोटोत त्याच्या शरीराला गुंडाळलेली स्फोटकं स्पष्टपणे दिसत आहेत. त्यानं एकट्यानंच हा हल्ला घडवून आणला असावा अशी शक्यता महापौरांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांचे इरादे यशस्वी होऊ देणार नाही असं महापौर बिल डी ब्लासिओ यांनी सांगितलं आहे.
मॅनहॅटनमधल्या टाइम्स स्क्वेअरजवळच्या पोर्ट अॅथॉरिटी बस टर्मिनलला - 42 स्ट्रीट, 8 अॅवेन्यू जवळ हा स्फोट झाला होता.
द पोर्ट अॅथोरिटी बस स्थानक हे अमेरिकेतलं सर्वांत मोठं बस स्थानक असून वर्षाला साडेसहा कोटी प्रवासी इथून प्रवास करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)