फोटो गॅलरी : लंडनवर बर्फाची पांढरी चादर

लंडनमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे संपूर्ण लंडन बर्फाच्या चादरीत बूडून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या बर्फाचा आनंद केवळ इथली माणसंच नव्हे तर प्राणीसुद्धा घेताना दिसत आहेत.

बर्फात मजा घेणारा हा ससा मार्टीन ब्लिथ यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे.

लंडनमध्ये सध्या अनेक ठिकाणी मोठी बर्फवृष्टी होत आहे.

बर्फामुळे वाहनांना मार्ग शोधणंही अवघड जात आहे.

लंडनमधल्या ब्रेकन विभागाजवळील सनीब्रिज परिसरात सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. इथे जवळपास 30 सेंटीमीटर म्हणजेच 12 इंच जाडीचा बर्फाचा थर साठला आहे.

इंग्लंड आणि वेल्समध्ये अनेक शाळा या बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, सेंट्रल लंडनमध्ये अनेक जण रोजच्या कामांसाठी बाहेर पडताना दिसत आहेत.

लंडनमधले नागरिक मात्र बर्फाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. अॅँथनी मॉरीस यांनी अशाच बर्फात स्कीईंगचा आनंद घेणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो टिपला आहे.

हे फ्लेमिंगो काही खरेखुरे नाहीत. लॉरा इवान्स यांनी सेंट अल्बान्स इथल्या आपल्या गार्डनमधल्या प्लास्टीकच्या फ्लेमिंगोंचे हे खास फोटो काढले आहेत.

हे घोडे बर्फवृष्टीचा आनंद घेत असून बर्फापासून रक्षण करण्यासाठी त्यांना खास शिवलेले कपडेही घालण्यात आले आहेत.

लंडनमध्ये बर्फाने आच्छादलेल्या छतांवर एक कटाक्ष टाकताना हा कोल्हा.

बर्फवृष्टी होत असतानाही डर्बीमध्ये प्रिमियर लीगचे तीन सामने खेळवण्यात आले. या दरम्यान मात्र कर्मचाऱ्यांना मैदानातून बर्फ काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. अनेक भागात विजेचे खांबही पडले आहेत. तसंच शहरातील रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवाही बाधित झाली आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)