You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिनटिन : एका दुर्मीळ व्यंगचित्रासाठी कोट्यवधी रुपयांची बोली
बेल्जियमचे व्यंगचित्रकार जॉर्जेस रेमी उर्फ हेर्ज यांच्या प्रतिभेची साक्ष देणाऱ्या वार्ताहर टिनटिन आणि त्याचा इमानी कुत्रा स्नोवी या चित्राला तब्बल 5,00, 000 डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम मिळाली आहे.
पॅरिसमधल्या लिलावात या चित्रावर एवढी प्रचंड बोली लागली.
1939 मध्ये हेर्ज यांनी रेखाटलेल्या किंग ओटोकार्स सेप्टर या अल्बममधलं हे चित्र आहे. शूटिंग स्टार या पुस्तकातल्या मूळ मालिकेला 350000 डॉलर्स इतकी किंमत मिळाली.
मात्र अमेरिकेच्या अंतराळवीरांनी स्वाक्षरी केलेल्या 'टिनटिन अॅडव्हेंचर डेस्टिनेशन मून'च्या प्रतीला मात्र कोणीही दाता मिळू शकला नाही.
हेर्ज यांची पुस्तकं, स्केचेस आणि रेखाटनं पॅरिसमधल्या एका प्रदर्शनात विक्रीकरता मांडण्यात आली आहेत. हेर्ज यांनी निर्मिती केलेल्या लोकप्रिय व्यक्तिमत्वांमध्ये टिनटिन आणि स्नोयी यांचा समावेश आहे.
जगातल्या 90 विविध भाषांमध्ये टिनटिनची कार्टून भाषांतरित झाली आहेत. या रेखाटनांच्या 200हून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. यातून आजही या कार्टून्सची लोकप्रियता लक्षात येते.
गेल्या वर्षी टिनटिन पुस्तकातल्या 'एक्सप्लोरर्स ऑन द मून' रेखाटनाला पॅरिस इथे झालेल्या लिलावात 16.4 लक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम मिळाली होती.
द ब्लू लोटस पुस्तकातल्या 'टिनटिन इन शांघाय' या चित्राला हाँगकाँगमध्ये त्याच वर्षी 12 लक्ष डॉलर्स एवढी किंमत मिळाली.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)