फोटो गॅलरी : रंगारंग मुंबईची ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातली छायाचित्र

'मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका..' असं एका लावणीत पठ्ठे बापूरावांनी मायानगरी मुंबईचं वर्णन केलं आहे. या नगरीने प्रत्येकावर भुरळ घातली आहे. कुणी यातून वाचलं असेल, अशी व्यक्ती सापडणं विरळा.

ज्येष्ठ छायाचित्रकार, निर्मात्या, पटकथाकार सूनी तारापूरवाला यांनी 1977 पासून मुंबईची निरनिराळी रूपं टिपली आहेत.

'मिसिसिपी मसाला', 'द नेमसेक' आणि 'ऑस्कर' नामांकनप्राप्त 'सलाम बॉम्बे' सारख्या सिनेमांचं लिखाण त्यांनी केलं. तसंच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'लिटल झिजू'चं दिग्दर्शनही त्यांचंच होतं.

सूनी तारापूरवाला यांनी टिपलेल्या या फोटोंमधून मुंबईच्या दैनंदिन जीवनाचं दर्शन तर होतच, शिवाय देशातल्या एका वैविध्यपूर्ण शहराच्या सामाजिक स्थानाचं महत्त्वही .

मुंबईबद्दल असलेल्या आपुलकीतून त्यांनी हे फोटो काढलेले आहेत.

सूनी तारापूरवाला यांनी काढलेल्या या फोटोंचं प्रदर्शन "होम इन द सीटी" या शीर्षकाने शेमोल्ड प्रेस्कॉट रोड या गॅलरीत ऑक्टोबर 2017 मध्ये भरलं होतं.

.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)