अमेरिका : नेट चक्रीवादळामुळे भूस्खलन, सतर्कतेचा इशारा

अमेरिकेत नेट नावाचं आणखी चक्रीवादळ आलंय. श्रीणी-1 चं हे वादळ आहे.

लुझियानानामधील मिसिसीपी नदीच्या तोंडावर नेट चक्रीवादाळामुळे भूस्खलन झाल्याची माहिती यूएस नॅशनल हरिकेन सेंटरनं (एनएचसी) दिली आहे.

137 किलोमीटर प्रतितास या वेगानं हे वादळ उत्तरेकडे सरकत आहे. यामुळं मिसिसीपी नदीच्या किनाऱ्यावर पुन्हा भूस्खलन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लुझियाना, मिसिसीपी, अल्बामा आणि फ्लोरिडाच्या काही भागाला या वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेट चक्रीवादाळामुळे निकारागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या महिन्यात आलेल्या मारिया आणि इरमा चक्रीवादाळाच्या तुलनेत नेटची तिव्रता कमी आहे. पण, तरी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज मात्र व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लुझियाना प्रांतासाठी आणिबाणी घोषणा केली आहे. या वादाळाचा सामना करण्यासाठी संभाव्य ती सर्व मदत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

अल्बामामध्ये जोरदार वारे वाहत आहेत. वादाळाचा समाना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन रिपब्लिकन गव्हर्नर के आयवी यांनी केलं आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खाडी किनाऱ्यावरील पाच बंदरं बंद ठेवण्यात आली आहेत.

मेक्सिको खाडीतील बहूतांश तेल आणि वायू कपन्यांनी त्यांच्या तेल विहिरींवरील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलं आहे.

खाडी किनाऱ्यावरील परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या वादाळामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच नागरिकांच्या जिवाला धोकाही निर्माण होऊ शकतो असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

लुझियानाचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. एक हजारापेक्षा जास्त लष्करी जवानांना या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे.

न्यू ऑरलन्स भागातही चक्रीवादाळाच्या दृष्टीनं तयारी करण्यात येत आहे.

निकरागुआ, कोस्टा रिका आणि होंडुरासमध्ये हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे.

अनेक जण मदत केद्रांमध्ये किंवा उघड्यावर राहत आहेत. कोस्टारिकामध्ये 4 लाख लोकांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरं जाव लागत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)