You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे : मला 17 वर्षांबद्दल विचारता, काँग्रेसचं काय झालंय ते पाहा ना
"मला प्रश्न विचारतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होती पण आमदार का निवडून येत नाही? मग ते 13 आमदार काय सोरटवर आले होते का?" असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
राज ठाकरेंच्या मनसेला आज (9 मार्च) 17 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानताना म्हटलं, की मनसेच्या प्रत्येक सैनिकाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार. शुभेच्छा आहेतच. पण कोणतीही सत्ता नसताना ही जी उर्जा आहे ती पक्ष पुढे घेऊन जात असतो.
यावेळी बोलताना राज यांनी संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला.
त्याबद्दल बोलताना राज यांनी म्हटलं, "त्या दिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. अनेकांनी मला विचारलं. मी निश्चित सांगतो. ज्याने केलंय त्याला पहिल्यांदा कळेल की त्याने केलंय आणि मग इतरांना कळेल."
माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊ देणार नाही. अनेक विषयांवर मी 22 तारखेला बोलणार आहे, असंही राज यांनी म्हटलं.
ते आमदार काय सोरटवर आले होते?
"पक्ष कशातून गेला याचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. काही लोक गेले पण एकेककटे गेले. मला प्रश्न विचारतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होती पण आमदार का येत नाही? मग ते 13 आमदार काय सोरटवर आले होते का?
हा एक प्रपोगंडा आहे. काही पत्रकार काही पक्षांना बांधले आहेत. म्हणून ते जाणूनबुजून असा प्रचार करतात."
17 वर्षांचं मला काय विचारता काय झालं, काँग्रेसच पाहा काय ना काय झालं. जो पक्ष इतकी वर्षं सत्तेत होता, त्याची काय अवस्था आहे, असं राज यांनी म्हटलं.
"राजू पाटील पक्षाची बाजू विधानसभेत एकटा मांडतोय. शोल मध्ये बोलतो तसा एक ही काफी है. विधानसभा भरली तर काय होईल यांचं? कोणीतरी सांगितलेलं असतं म्हणून ते असा प्रचार करतात."
'कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलं नाही'
आंदोलनं अर्धवट सोडतात असं म्हणतात. मला एक आंदोलन दाखवा, जे अर्धवट सोडलं, असं राज य
जे प्रश्न आम्हाला विचारतात ते इतरांना का विचारत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी टोलमुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा दाखला दिला.
आपल्यामुळे महाराष्ट्र टोलमुक्त झाल्याचा दावाही त्यांनी केला.
आपण गेल्या 17 वर्षांत काय केलं याचा ठळक अशी काही आपली आंदोलनं, तिथल्या काही गोष्टी, याचं पहिलं डिजिटल पुस्तक प्रकाशित करत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- नाशिकच्या कामाचा आढावा घेतला तेव्हा आम्ही नाशिक मध्ये किती काम केलं हे जाणवल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.
- नाशिक महापालिकेत राज्य आलं तेव्हा एकावरही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. आपण 50 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. गेल्या पाच वर्षांत काय झालं? आता लोक हळहळत आहेत.
- मोबाईलमध्ये मराठी सूचना आमच्यामुळे सुरू झाल्या.
- मराठी चित्रपटगृहांना चित्रपटगृहं आमच्यामुळे मिळाली. इथले निर्माते हळहळतात. मल्टिप्लेक्समध्ये कराराने मराठी चित्रपटासाठी ठेवण्यात येईल असं नमूद केलं आहे. एकदा हात जोडून सांगितलं. मग हात सोडून सांगितलं, तेव्हा ऐकलं.
- मला कधी कधी हसायला येतं. अशा गोष्टींसाठी आंदोलन करायला लागतं का हो इतर राज्यांत? महाराष्ट्रात बाहेरून येणारे लोक तुम्हाला गृहित धरतात,
- भोंग्याच्या प्रकरणानंतर मला अयोध्येत बोलावलं. पण त्याला विरोध केला. विरोध करणारे हिंदुत्ववादीच होते. आतलं राजकारण मला समजलं होतं. त्यामुळे मी गेलो नाही. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी. जेव्हा भोंग्याविरुद्ध आंदोलन केलं तेव्हा माझ्या सैनिकांविरुद्ध 17 हजार खटले दाखल केले. काय झालं? थेट मुख्यमंत्रिपदच गेलं.
- मी भाग्यवान समजतो की मला तुमचं सहकार्य लाभलं. त्रास होतो. एक तुम्हाला सांगतो. मळभ दूर होईल. मी तुम्हाला आशा देत नाही. पुढेही आपल्याला लढायचं आहे. मला दहावीत नापास झाल्यासारखं वाटतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)