शशिकांत वारिसे: नाणारसंदर्भात बातमी करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. नाणारसंदर्भात बातमी शेअर करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू
राजापूर येथे झालेल्या थार आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले 'महानगरी टाइम्स'चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसेंच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती.
'मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो' अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात ही बातमी होती. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष आहेत.
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांचे निधन झाले.
मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
2. 'आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सांगितले..'
देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पूनावालाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रातील काही गोष्टी समोर न्यायालयीन सुनावणीत समोर येत आहेत. पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने आफताबने पोलिसांनी सांगितले होते की श्रद्धाचा मृतदेह जाळून तिच्या राखेची विल्हेवाट लावली.
यात 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले आणि ते फ्रीज तसेच कपाटात लपवून ठेवल्याचे म्हटलं आहे. आफताबचे वकील एम. एस. खान यांनी खटल्यावेळी आपले म्हणणे मांडले जाईल, असं सांगितले. 'अमर उजाला'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Social media
आफताबने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबावर आधारित असलेले 6,629 पानी आरोपपत्र दिल्लीतील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
आधी चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आपण श्रद्धाचा मृतदेह जाळून राखेची विल्हेवाट लावली आणि तिच्या हाडांची भुकटी करून ती फेकून दिली, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे कबूल केले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
3. ठाकरेंचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार
"आम्हाला प्रतिआव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का? तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, हा आरोप मी जाणीवपूर्वक करत आहे", असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं आहे.
"मी उद्धवजींना नम्रपणे विनंती करीन. आदित्यजींच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका. आमच्यावर दगड मारायचा विचार कराल तर शंभर बोटं तुमच्याकडे येणार आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/ASHISH SHELAR
कमला मिल कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधलेल्या हुक्का पार्लर आणि बारमध्ये 2017 रोजी आग लागून 14 मुंबईकरांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता. पण उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर 2020 मध्ये आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा गुन्हा मागे घ्यायला लावला आणि मालकाला मोकळं केलं असं शेलार म्हणाले.
"जगविख्यात डॉक्टर अमरापूरकर हे मनपाच्या भोंगळ कारभाराचे बळी पडले. पावसाच्या पाण्यात चालत जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. याच वरळीच्या बीडीडी चाळीमधील चार महिन्याच्या चिमुरड्याला नायर रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले नाही. बाळ रडून रडून मृत्यूमुखी पडलं. आदित्य ठाकरे त्यांना बघायलाही गेले नाहीत", असं शेलार म्हणाले.
मुंबईकरांच्या भावना समजून घेणारे सरकार सत्तेवर बसले आहे. आज कोळीवाड्यातले प्रश्न सुटले आहेत. मुंबईकरांचे आशीर्वाद मिळाले तर पुढच्या पाच वर्षात मुंबईचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सरकारतर्फे देतो असं शेलार म्हणाले.
4. शिक्षक सेवकांचं मानधन वाढवलं
शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने आज अध्यादेश काढून मानधनाबाबत आदेश काढले आहेत. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
थमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांचं वेतन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आलेलं आहे.
शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय 22 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता.
5. पालिका निवडणुकांबाबतची सुनावणी लांबणीवर
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 'महानगर'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे अन्य महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झाल्याने निवडणुकांबाबतच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीची नवी तारीख लवकरच सूचित करण्यात येईल.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









