केरळःतृतीयपंथी जोडप्याने दिला बाळाला जन्म

फोटो स्रोत, ZIYA PAVAL/ZAHAD
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
केरळमधल्या एका ट्रान्सजेंडरला बाळ होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. 21वर्षीय जिया पावल आमि जहद या ट्रान्सजोडप्याला बाळ झालं आहे.
मार्च महिन्याची तारीख सुरुवातीला देण्यात आली होती पण जहदला मधुमेहाचा त्रास असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लोक या बाळाबाबत काय बोलत आहेत असं विचारलं असता जिया जोरात हसते.
जियाने सांगितलं, "ट्रान्सजेंडर समाज अतिशय आनंदी आहे. पण ट्रान्सजेंडर समाजात आणि अन्य माणसंही रुढीपरंपरा पाळतात त्यामुळे समलैंगिक माणसांना मूल होऊ शकत नाही असं त्यांना वाटतं. पण याने काही फरक पडत नाही".
जिया मुलगा म्हणून जन्माला आली होती. आता ती मुलगी आहे. दुसरीकडे जहद लहापणापासून मुलगीच आहे आणि पुरुष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तीन वर्षांपूर्वी कोझिकोड इथे दोघांची भेट झाली. या भेटीच्या खूप आधी जियाने ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया करुन घेतली होती. जहदने स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली होती.
दीड वर्षांपूर्वी ठरलं
जहदचं अंडाशय आणि गर्भाशय काढण्यात आलं नाही कारण त्याची टेस्टोस्टीरोन हार्मोनल थेरपी सुरु होती. जियावर लिंगबदलासाठी हार्मोन थेरपीचे उपचार सुरु होते.

फोटो स्रोत, ZIYA PAVAL/ZAHAD
जियाने सांगितलं, "दीड वर्षापूर्वी आम्ही मुलाचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही हार्मोनल थेरपी बंद केली. डॉक्टरांनीच तसा सल्ला दिला.
मूल हवं म्हणून तुम्ही एकत्र आलात का असं आम्ही विचारलं. त्यावर जिया म्हणाली, नाही. आम्ही प्रेमात पडलो".
या दोघांमध्ये प्रेम वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरु झालं, बहरलं.
जिया सांगते, "मी एक पारंपरिक मुस्लीम कुटुंबात वाढले. घरच्यांनी मला शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी परवानगी दिली नाही. मी नृत्य करु नये यासाठी त्यांनी माझे केसही कापले. एका युथ फेस्टिव्हलसाठी मी गेले होतो, तिथून मी घरी परतलेच नाही".
ट्रान्सजेंडर लोकांना नृत्य शिकवणाऱ्या एका कम्युनिटी सेंटरमध्ये जिया गेली.
नॉर्मल डिलिव्हरी
जहदचं आयुष्यही काहीसं असंच आहे. जहदची लिंगओळख कळल्यानंतर ती घरच्यांपासून वेगळी राहू लागली. जहद ख्रिश्नच आहे. तिरुअनंतपुरममध्ये आलेल्या ओकी वादळादरम्यान त्याचं घर आणि बोट दोन्ही बुडालं.
जहदने घरच्यांना गरोदर असल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांची भूमिका सकारात्मक झाली. गरोदरपणात ते जहदला मदत करत आहेत. जहदच्या आईने सांगितलं होतं की याबाबत जाहीर बोलू नका.

फोटो स्रोत, ZIYA PAVAL/ZAHAD
जियाने सांगितलं की गेल्या आठवड्यातच आता जगाला ही गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे. मुलाला वाढवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत का?
जिया सांगते, "जगणं खूपच कठीण आहे. लहान मुलांना नृत्य शिकवण्याचं काम मी करते. जहद अकाऊंटंट आहे. त्याने सुरुवातीला तिरुअनंतपुरम सरकारने तयार केलेल्या जेंडर पार्कमध्ये काम केलं आहे. त्यानंतर तो कोझिकोडला गेला, जिथे सुपरमार्केटमध्ये नोकरी केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढणं माझ्यासाठी आवश्यक आहे. जहदलाही बाळाला जन्म दिल्यानंतर दोन महिन्यातच कामावर परतायचं आहे. त्यानंतर मी मुलाची काळजी घेईन".
कोझिकोड सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं ही डिलिव्हरी नॉर्मल असेल. डॉक्टरांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
जटिल हार्मोन थेरपी
बेंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील लिंगबदल तज्ज्ञ एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. महेश डीएन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जहद सेक्स हार्मोन थेरपीचे उपचार पुन्हा सुरु करु शकतात. अंडाशय आणि गर्भाशय काढलं जात नाही तोपर्यंत 40व्या वर्षापर्यंत कोणतीही समस्या उद्भवत नाही".

फोटो स्रोत, ZIYA PAVAL/ZAHAD
डॉ. महेश यांनी एका महिलेची लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे. पायलट होण्याची इच्छा असलेल्या अडम हॅरी यांनी पुरुषाचा बाई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी हार्मोन थेरपी थांबवली. काही काळानंतर पुन्हा सुरु केली. जिया आणि जहद यांनी सांगितलं की लिंगबदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेटवर नव्या जेंडरची नोंद होईल. मग ते लग्न करु शकतील".
जिया आणि जहद आईवडील होणारे पहिले ट्रान्सजेंडर दांपत्य आहेत का?
जियाने हसून सांगितलं की, "आतापर्यंत तरी ट्रान्सजेंडर समाजात कोणीही स्वत:ला जैविक पालक असल्याचं म्हणत नाही".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








