'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले... #5मोठ्याबातम्या

एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER/EKNATH SHINDE

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले....

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हांसाठी दिलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारला आहे. चिन्हांसाठी तीन नवे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आलं आहे.

त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

नवं नाव मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार….

असं त्यांनी ट्वीट केलं असून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटोही त्याला जोडला आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

2. शहरी नक्षलवादाचा गुजरात नाश करेल- नरेंद्र मोदी

गुजरात विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहे.

आम आदमी पक्षाने पंजाबनंतर गुजरातकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये क्षीण झाल्यानंतर मिळालेली मोकळी जागा भरण्यासाठी आम आदमी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपातर्फे त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भरुचमधील कार्यक्रमात नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, TWITTER/NARENDRA MODI

फोटो कॅप्शन, भरुचमधील कार्यक्रमात नरेंद्र मोदी

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आम आदमी पक्षावर थेट टीका केली आहे. भरुच येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहरी नक्षलवादाचा गुजराती लोक नाश करतील असं ते म्हणाले. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मोदी म्हणाले, " शहरी नक्षलवादी नव्या स्वरूपात गुजरातमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने आपली वेशभूषा बदलली आहे. 'शहरी नक्षलवादी' आमच्या भोळ्या आणि उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहे. ते येथे पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही आमच्या तरुण पिढीला वाया जाऊ देणार नाही. देशाला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांपासून आपल्या तरुणांना वाचवायचे आहे. ते परकीय शक्तींचे दलाल' आहेत. त्यांच्यापुढे गुजरात कधीही झुकणार नाही. गुजरात त्यांचा नाश करेल."

3. स्टॅलिन यांचा पुन्हा 'राग तमिळ'

हिंदी भाषेविरोधात तामिळनाडूच्या राजकीय नेत्यांनी विधानं करणं फारसं नवं नाही. तमिळ राजकारण्यांनी हिंदीला वेळोवेळी विरोध केला आहेत. आयआयटी, आयआय़एम आणि केंद्रीय विद्यापीठांत माहितीचं माध्यम म्हणून हिंदीची शिफारस झाल्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जबरदस्त टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे संग्रहित छायाचित्र

हिंदीची सक्ती करुन आणखी एक भाषायुद्ध लादू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. ही बातमी सकाळने दिली आहे.

'देशातील 22 अधिकृत भाषांच्या यादीत आणखी भर घालण्याची मागणी लोक करीत असताना अशा अहवालाची गरजच काय,' असा सवाल स्टॅलिन यांनी केला. केंद्र सरकारच्या पदांसाठीच्या स्पर्धा परिक्षांमधून इंग्लिश वगळण्याची शिफारस का करण्यात आली असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

4. आता पाळीव प्राण्यांच्या विमान प्रवासासाठी सुविधा

पाळीव प्राणी घरात असल्यामुळे अनेक लोकांना परदेश प्रवासाला जाण्यात अडथळा येतो. परंतु भारतात आकासा एअर कंपनीने प्रवाशांना पाळीव प्राणी घेऊन प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

त्यासाठी तिकिट आणि काही नियम आहेत. ज्या पाळीव प्राण्याला विमानातून न्यायचे आहे त्याचे वजन किमान 7 किलो आणि जास्तीत जास्त 32 किलो ठेवण्यात आलं आहे.

यापेक्षा वजनदार प्राणी असेल तर त्यासाठी विमानातही सुविधा दिली जाईल. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

5. दिल्लीतली फटाकेबंदी 2 जानेवारीपर्यंत

राजधानी दिल्लीमध्ये आणि दिल्ली राजधानी क्षेत्रात वायूप्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासाचा विचार करुन इथली फटाक्यांवरील बंदी 2 जानेवारी 2023 पर्यंत वाढवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी घातली असून यामुळे फटाके खरेदी-विक्री आणि फटाके फोडणे बंदच राहील. ही बातमी टाइम्सनाऊ मराठीने प्रसिद्ध केली आहे.

2020 च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालाचा विचार करता जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 20 शहरं ही भारतात आहेत. त्यात PM 2.5 चं वार्षिक प्रमाण सर्वाधिक आहे. मानवी आरोग्यासाठी सर्वात घातक असे हे कण असतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांच्या तुलनेत हवेतील PM 2.5 ची पातळी ही खूप जास्त आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट या दिल्लीतील संस्थेच्या अहवालानुसार 2018, 2019 आणि 2020 मध्ये दिल्लीत PM 2.5 च्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळून आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)