छेल्लो शो : ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या सिनेमाची गोष्ट

चित्रपटाचं पोस्टर

फोटो स्रोत, Instagram/@roykapurfilms

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारत

यावेळेस भारतातर्फे राजामौली यांच्या आरआरआर सिनेमा की गुजराती सिनेमा 'छेल्लो शोला' बेस्ट फॉरेन फिल्म श्रेणीमध्ये पाठवावं यावर सोशल मीडियात वाद-प्रतिवाद होत होते.

भारतासह अनेक देशात गाजलेला आरआरआर सिनेमा ऑस्करसाठी पाठवला जाईल, असं अनेक लोकांना वाटत होतं. या सिनेमानं अमेरिकेसह अनेक देशांत भरपूर व्यवसाय केला. तसंच परदेशातील मोठ-मोठ्या समिक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

परंतु ऑस्करला पाठवण्यासाठी छेल्लो शोची निवड झाल्यावर आरआरआर फार न आवडलेल्या लोकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

एखादा सिनेमा ऑस्करमध्ये जाईल असं वाटत असताना भारताने दुसऱ्या सिनेमाची निवड करण्याची नजिकच्या काळातली ही दुसरी वेळ असल्याचं व्हरायटी मॅगझिनचे लेखक क्लेटन डेव्हिस यांनी लिहिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

चित्रपट समीक्षक सुचित्रा त्यागी लिहितात, "मी आरआरआरची फॅन नाही, पण हे एकदम विचित्र वाटतंय. आंतरराष्ट्रीय सिनेमांना ऑस्कर अकादमीची संमती मिळवण्यासाठी मार्केटिंगच्या दृष्टीने किती प्रयत्न करावे लागतात हे ऑस्करबद्दल माहिती असणाऱ्यांना कळत असेलच. राजामौली यांना पाश्चिमात्य प्रेक्षकांकडून ती संमती मिळालेली आहे. मग त्याचा वापर का केला नाही?"

गेल्या महिन्यात अनुराग कश्यप यांनी ऑस्करला सिनेमा पाठवण्याबाबत लिहिलं होतं, "आरआरआरच्या तुलनेत मला राजामौली यांचे दुसरे सिनेमे आवडतात. पण पाश्चिमात्य लोक आरआरआरला वेगळ्या दृष्टीने पाहातात आणि त्यांना हा सिनेमा आवडलायही. जर आरआरआरची निवड झाली तर त्याला अकादमी अवॉर्ड मिळण्याची 99 टक्के शक्यता आहे. आरआरआरने हॉलिवूडला प्रभावित केलं आहे, त्याची निवड झाली तर भारताला अंतिम पाच सिनेमात स्थान मिळू शकतं."

ऑस्करला सिनेमा पाठवणाऱ्या 17 सदस्यांच्या निवड समितीचे प्रमुख टी. व्ही. अग्रवाल यांनी गुजराती सिनेमा छेल्लो शोचं नामांकन सर्वसंमतीने झालं आहे, असं माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये बोलताना सांगितलं.

अर्थात ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आरआरआरकडे अजूनही आहे. ऑस्कर समितीतर्फे सर्वोत्कृष्ठ सिनेमा, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, उत्कृष्ठ स्क्रीन प्ले अशा श्रेणीमध्ये नामांकन मिळू शकतं.

दक्षिण कोरियन सिनेमा पॅरासाईटला 2019मध्ये बेस्ट सिनेमाचं ऑस्कर आणि बेस्ट इंटरनॅशनल सिनेमाचं ऑस्कर मिळालं होतं. एखाद्या इंग्रजी नसलेल्या सिनेमाला ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

छेल्लो शो

आरआरआरला मिळालेलं यश, त्या सिनेमाची भव्यतेची कल्पना सर्वांना आहे, पण गुजराती सिनेमा छेल्लो शोचेही चाहते आहेत. अर्थात या सिनेमाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

गुजरातमधील गीरमधलं एक लहानसं गाव. मोकळ्या आकाशाखाली शेतात आयुष्य जगणाऱ्या एका मुलाला सिनेमावर प्रेम जडतं. तो स्वतः सिनेमाचे धडे गिरवतो, एके दिवशी चित्रपट बनवायला सुरू करतो. त्याचे सिनेमे जगभरात गाजतात.

वास्तविक हा सिनेमा गुजरातच्या पॅन नलिन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तसंच त्याची निर्मितीही त्यांनी केली आहे.

पॅन नलीन

फोटो स्रोत, Instagram/@pan.nalin

फोटो कॅप्शन, पॅन नलिन आणि या सिनेमातील पात्राच्या आयुष्यातील साम्य लक्षात येतं.

छेल्लो शो आणि पॅन नलिन यांच्या आयुष्यातलं साम्य सरळसरळ लक्षात येतं. सिनेमात काम केलेल्या मुलामध्ये नलिन यांचं प्रतिबिंब दिसून येतं.

नलिनकुमार पंड्या म्हणजेच पॅन नलिन यांनी बॉलीवुड आणि हॉलिवुडपर्यंत आपली प्रतिमा तयार केली आहे. नलिन यांनी वडोदरामधून फाइन आर्ट्सची पदवी मिळवली त्यानंतर अहमदाबादमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये जागतिक सिनेमा जाणून घेण्याची संधी त्यांना मिळाली.

त्यांचा सिनेमा छेल्लो शो गेल्या काही काळापासून अनेक पुरस्कार मिळवत आहे. भारतातील आरआरआर सारख्या सिनेमांना मागे टाकून तो ऑस्करला गेला आहे.

ऑस्कर समितीत सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले ते कदाचित एकमेव गुजराती चित्रपट निर्माते असावेत.

या चित्रपटातील मुख्य अभिनेता भविन रबाराचंही भरपूर कौतुक होत आहे. सिनेमा पाहिल्यावर त्याला या माध्यमाबद्दल कौतुक निर्माण होतं. त्याची स्वतःची स्थिती चांगली नसली तरी त्याला जगाला गोष्टी सांगायच्या आहेत.

चित्रपट पाहाण्यासाठी तो फजल नावाच्या प्रोजेक्शनिस्टशी मैत्री करतो आणि त्याला आपला खाऊचा डबा देतो. या डब्यात त्याची आई स्वादिष्ट पदार्थ देत असते. फक्त त्या बदल्यात सिनेमागृहात सिनेमा पाहाता यावा असं ते ठरवतात.

फिल्म

फोटो स्रोत, Treeshul media

त्याच्यावर सिनेमाची इतकी जबरदस्त जादू होते की त्याला स्वप्नातही सेल्यालॉईडच्या पर्वतावर आपण उड्या मारत असल्याचं दिसतं.

जिल्न आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला देण्यात आलेल्या मुलाखतीत पॅन नलिन म्हणाले, "तो सीन कोणत्याही स्पेशल इफेक्टशिवाय चित्रित करण्यात आला आहे. माझ्या टीमने भारतभरात 35 एमएम सेल्युलॉईड प्रिंट शोधल्या. हे आव्हानात्मक काम होतं कारण बहुताँश प्रिंट्स जाळून टाकण्यात आलेल्या होत्या. बाकी अर्काईव्हमध्ये आहेत. प्रत्येक रिळ शोधून ते ट्रान्सपोर्ट करण्यात आठ महिने गेले. पण हा सीन धाडसाचाही होता. कारण आपण चुकीच्या पद्धतीने त्यावर पडलात तर तुम्हाला कापू शकतं. पण भविनने हा सिन नीट केला. एकदा नाही तर पाचवेळा केला.

पॅन नलिन यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहाचा स्टॉल चालवत. पण नलिन यांची गाडी त्या स्टेशनवर थांबणारी नव्हतीच, तीचं स्वप्न वेगळंच होतं. आठ-नऊ वर्षांपर्यंत त्यांनी सिनेमागृहही पाहिलं नव्हतं.

इथपासून ते ऑस्करपर्यंत त्यांच प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. त्यांची आज चर्चा होत असली तरी ते गेली दोन दशकं या उद्योगात कार्यरत आहेत आणि सफलही झाले आहेत. या प्रवासात त्यांनी जेंडर असो वा अध्यात्म अशा अनेक विषयांना स्पर्श केला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, ऑस्करः युद्धाशी लढलेल्या सीरियन मुलाची गोष्ट

2015मध्ये त्यांच्या अँग्री गॉडेसेस जेंडर या हिंदी सिनेमात चार मैत्रिणी, त्यांची स्वप्नं, त्यातला गुंता तसेच स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या मैत्रिणीवर बलात्कार होऊन खून होतो, त्यानंतर महिला कशा आवाज उठवतात याचं चित्रण आहे.

पॅन नलिन यांनी युरोपात राहूनही काही सिनेमे केले. 2001मध्ये समसारा सिनेमा आला तेव्हा जगाचं लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यात भारत, इटली, फ्रान्ससह अनेक देशांची सहनिर्मिती होती. एका बौद्ध भिक्षूची मोक्ष प्राप्त करण्याची ही गोष्ट आहे. 2002 साली मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला पुरस्कार मिळाला.

2001 साली त्यांनी आयुर्वेदावर केलेल्या माहितीपटाने जर्मनीत भरपूर व्यवसाय केला. त्याचं आयुर्वेद आर्ट ऑफ बिंग असं नाव होतं.

आपल्या सिनेमाची निवड झाल्यावर नलिन यांनी ट्वीट केलंय, "ओह माय गॉड, कशी असेल ही आजची रात्र! फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआय ज्युरी सदस्यांचे खूप आभार. छेल्लो शोवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार. आता मी पुन्हा श्वास घेऊ शकतो, अशा सिनेमांवर विश्वास ठेवू शकतो, जो मनोरंजन करतो, प्रेरणा देतो आणि ज्ञान वाढवतो."

चित्रपटाचं पोस्टर

फोटो स्रोत, Treeshul media

या सिनेमासाठी बाल कलाकार शोधणं सोपं नव्हतं. त्यांच्या टीमने सौराष्ट्र आणि कच्छमधील दुर्गम भागातून त्याला शोधून काढलं आहे.

नलिन यांचे वडील जसे रेल्वे स्टेशनवर काम करायचे तसेच भविन रबाराचे वडीलही वेगवेगळ्या शहरांत बस चालवतात. सिनेमात काम करणारी इतर मुलंही रबारा, कोळी, सिद्दी अशा वेगवेगळ्या समुदायातील आहेत.

लहानपणच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आल्याचं दाखवणारा हा सिनेमा 1998 सालच्या इटालियन सिनेमा पॅराडिजोची आठवण करुन देतो. ही एक मुलगा आणि वृद्ध प्रोजेक्शनिस्टची गोष्ट होती.

पॅन नलिनचा सिनेमा भारतात रिलिज करण्याची घोषणा सिद्धार्थ रॉय कपूर यांनी गेल्या आठवड्यात केली आहे.

ऑस्करसाठी खर्च

आपल्या सिनेमासाठी मोहीम चालवणं फार खर्चिक आणि मोठं काम आहे. मत देणाऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ऑस्कर मोहिमांवर लाखो डॉलर्सचा खर्च करण्यात येतो.

बेस्ट पिक्चर मोहिमेसाठी 10 लाख डॉलर खर्च होतात असं एका आकडेवारीच्या आधारे निर्माते आणि ब्लॉगर स्टिफन फॉलोज यांनी 2016मध्ये लिहिले होते. यात जाहिराती, प्रचारक तसेच माध्यमांवर खर्च होतात.

व्हीडिओ कॅप्शन, तुम्ही कधी पॅरासाईट म्हणून राहिला आहात?

भरपूर फी देऊन ऑस्कर सल्लागारांची नेमणूक करण्यात येते. हे सल्लागार अकादमी सदस्यांना सिनेमाबद्दल सांगतात. अकादमी सदस्यांना अमेरिकेतील मोठमोठया शहरांत सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी बोलावलं जातं.

मोठे स्टुडिओ सिनेस्टार तसेच अकादमी सदस्यांना अनेक कार्यक्रमांसाठी आमंत्रित करतात, जेणेकरुन जिंकण्याची शक्यता वाढते. तसेच विविध पार्ट्यांत 20 लाख डॉलर्स पर्यंत खर्च होतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)