आलिया भट्टचं जर्मनी कनेक्शन, हॉलिवूडपर्यंतचा प्रवास आणि चौकटी मोडणारी सक्सेस स्टोरी

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, वंदना,
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारत
आलिया भट्टचा हॉलिवूड डेब्यू असलेला 'हार्ट ऑफ स्टोन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूड स्टार गॅल गडोटसोबत या चित्रपटात आलियाची महत्त्वाची भूमिका आहे. ती या सिनेमात केया धवन नावाच्या हॅकरचा रोल करत आहे.
आज हॉलिवूडच्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या आलियाचं बॉलिवूडमधलं पदार्पण अकरा वर्षांपूर्वी झालं...'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून.
"हाथ में पॉमपॉम लेकर लड़कों के लिए चिल्लाना, वो मेरा स्टाइल नहीं है. वो मेरे लिए चिल्लाएं, सीटी बजाएं , दॅटस माय थिंग"
हा डायलॉग आहे 'स्टुडंट ऑफ द इयर' मधल्या शनाया सिंघानियाचा (आलिया भट्ट). डिझायनर कपडे, महागड्या गाड्या, ओव्हर द टॉप लाइफस्टाईल आणि आपला बॉयफ्रेंड असं या शनायाचं जगणं असतं.
हा चित्रपट रिलीज झाल्यावर आलियाच्या वाट्याला कौतुक कमीच आलं, उलट तिला अजून एक 'स्टार किड' म्हणून हिणवलं.
त्यावेळी एका रिव्ह्यूमध्ये लिहिलं होतं, 'आलिया भट्टकडे ना अभिनय कौशल्य आहे ना स्क्रीन प्रेझेन्स' किंबहुना तिची स्तुतीसुद्धा चेष्टेच्या स्वरूपात केली होती की, "आलिया क्यूटनेसच्या जोरावर प्रेक्षकांच मनोरंजन करेल."
पण आलियाच्या अभिनयाबाबत कोणी काही विशेष बोललं नाही. पुढे दोन वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये 'हायवे' हा चित्रपट आला.
यात आलियाने वीरां नावाचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. ही वीरा श्रीमंतांघरची लाडकी लेक असते. तिचं अपहरण होतं. तीन जणांची हत्या करणारा हा अपहरणकर्ता आणि वीरा यांचा 'हायवे'वरचा प्रवास सुरु होतो. खरं तर जिथं वीरांच आयुष्य कैद होतं अगदी तिथूनच तिचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरु होतो.
तिचं ते किंचाळण आणि मोठा मोनोलॉग चित्रपटात जीव ओततो. लहानपणी वीरावर लैंगिक अत्याचार झालेले असतात. ती गोष्ट तिला आतल्या आत कुरतडत असते. ही गोष्ट ती तिच्या अपहरणकर्त्याला सांगते.
"मैं नौ साल की थी. वो इम्पोर्टिड चॉकलेट लाते थे, मेरे अंकल. मुझे गोद में बिठाकर प्यार करते थे अकेले में बाथरूम के अंदर . चीखती थी मैं पर वो मेरा मुँह बंद कर देते थे ताकि मेरी चीख बाहर न निकले. बहुत दर्द होता था. बस..बस हो गया ये कहते थे. बेस्ट लड़की है तू दुनिया की. बार-बार आते थे. बोला किसी से न कहना. एक दिन मैंने मम्मी को बोल दिया. बताया मैंने उन्हें. मम्मी ने कहा किसी से न कहना. उसके बाद वो बंद हो गया. फिर भी वो (घर) आते रहे चॉकलेट लेकर. वो मुझे प्यार करते हैं. मैं हसती हूँ. उनको नमस्ते करो, उनके पैर छुओ. उन्हीं के बीच में रहना है."
अवघ्या दोन वर्षात शनाया ते वीराचा प्रवास करणाऱ्या आलियाच्या अभिनय कौशल्यावर प्रेक्षकांचा खरं तर विश्वास बसत नव्हता.
अॅक्टर, प्रोड्युसर, बिजनेसवूमन..
फिल्म 'हायवे'मध्ये अज्ञात रस्त्यांवर चालण्याचं धाडस करणारी ही आलिया आज हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्र आहे. तिने 'डार्लिंग्स' या चित्रपटाची निर्माती केली आहे.
चार फिल्मफेअर अवॉर्ड जिंकलेत. फोर्ब्स इंडिया 100 च्या यादीत तिने आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच तिची लहान मुलांच्या कपड्यांची कंपनी सुद्धा आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर'पासून ते ब्रह्मास्त्रपर्यंत आलियाला खूप मोठा पल्ला गाठावा लागला.

फोटो स्रोत, STEPHANE CARDINALE - CORBIS
'डार्लिंग्स'मध्ये आलियाच्या आईचा रोल करणाऱ्या शेफाली शाह म्हणतात की, "मी आलिया सोबत काम करत असताना तिचा अनुभव बघूनच मला आश्चर्य वाटलं. ती तिच्या कामात एकदम उत्तम आहे. तिच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. आलियाने डार्लिंग्स प्रोड्युस केला होता. जेव्हा ती सेटवर असायची तेव्हा ती अभिनेत्रीच्या भूमीकेत असायची. तिचा प्रोड्युसरचा चेहरा गायब व्हायचा. गुणी अभिनेत्री आहे ती."
एक अॅक्टर म्हणून आलियाने रोमँटिक, कॉमेडी चित्रपटांपासून हर तऱ्हेचे चित्रपट केले. मात्र वास्तवात तिचं जीवन अगदीच वेगळं आहे.
आलियाचं जर्मनी कनेक्शन
आलिया भटचं गुजरात व्हाया जर्मनी असं फॅमिली कनेक्शन आहे. तिचे वडील गुजराती असून आई सोनी राझदान अर्धी काश्मिरी आणि अर्धी जर्मन आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
त्यामुळे आलियाच्या चित्रपटाची बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली तो क्षण तिच्यासाठी खास होता.
आलियाच्या जर्मन कनेक्शनबद्दल महेश भट्ट लिहितात की,"झाडांच्या फांद्या जशा वाढतात तसंच माणसाच्या नातेसंबंधांचं आहे. आलियाच्या हायवे आणि गली बॉयने बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये एन्ट्री केली. त्याच जर्मनीत तुझ्या आजीचा जन्म झाला होता. हायवेमध्ये आलियाने जी बंडखोरी केली आहे ती तिला तिच्या पणजोबांकडून मिळाली आहे. तिच्या पणजोबांनी नाझींशी लढा दिला होता. ते हिटलरच्या विरोधात भूमिगत वृत्तपत्र चालवायचे. पण त्यांना पकडून तुरुंगात डांबण्यात आलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
आलिया तिच्या आजीसोबतचे फोटो शेअर करत असते. तिच्या आजीने नुकतंच 93 व्या वर्षात पदार्पण केलं. सोनी राजदाननेही एक फोटो पोस्ट केला होता.
पण विषय सुरू होता आलिया भटच्या कारकिर्दीचा. मागच्या 10 वातशात तिने स्वतःला सिद्ध केलंय. आणि आता ती बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये आहे.
स्टुडंट ऑफ द इयर ते ब्रह्मास्त्र
1999 मध्ये आलियाने 'संघर्ष' चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. 2014 मध्ये तिने 'टू स्टेट्स' आणि 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' मध्ये एका शहरी मुलीचा रोल केला होता. तेच 2016 मध्ये तिने 'उडता पंजाब' मध्ये काम केलं. यात तिने एका गरीब बिहारी मुलीची भूमिका केली होती.
"तो का हम राह भूल के आएं हैं, हैं, हमार सुनबा ना तो ****फाट जाई" हा तिचा भोजपुरी लहेजा बघता ती पंजाबमध्ये काम करायला आलेली मजुरचं वाटते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
तेच 2016 मध्ये आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न बघणारी 'डियर जिंदगी' मधली कायरा लहानपणापासूनचं एकटी पडलेली असते. तिच्या कौटुंबिक नात्यात दुरावा आलेला असतो आणि अशातच ती मानसोपचार तज्ञाच्या दारात जाऊन पोहोचते.
ती सांगते, "बचपन में जब रोना आता है तो बड़े बोलते हैं आँसू पोछो, जब ग़ुस्सा आता है तो बड़े कहते हैं स्माइल ताकि घर की शांति बनी रहे. नफ़रत करना चाही तो इजाज़त नहीं दी. अब जब प्यार करना चाहा तो पता चला कि इमोशनल सिस्टम ही गड़बड़ा गया, काम नहीं कर रहा. रोना, ग़ुस्सा, नफ़रत कुछ भी एक्सप्रेस नहीं करने दिया.."
गोव्याच्या मॉर्डन आणि काल्पनिक जगातल्या कायरा नंतर 70 च्या दशकात देशप्रेमाने भारावलेली सेहमत खान सुद्धा आलियाने तितक्याच ताकदीने उभी केली आहे. 2018 मध्ये 'राजी' चित्रपटात आलियाने सेहमत खानची भूमिका साकारली. अशा प्रकारची भूमिका वठवण तितकंच आव्हानात्मक होतं. सेहमत खान ही भारताची गुप्तहेर असते.
जेव्हा तिच्या पतीला (विकी कौशल) कळतं की आपली बायको गुप्तहेर आहे तेव्हा तो तिला विचारतो आपल्यातलं प्रेम तरी खरं होतं का ? यावर ती उत्तरते, "मैं अगर सच कहूँ भी तो क्या आप मेरा ऐतबार कर लेंगे?. मगर सबसे बड़ा सच ये है कि हिंदुस्तान से आगे मेरे लिए कुछ नहीं" देशाप्रती असलेली निष्ठा, आपल्याच लोकांना फसवल्याची भावना, असहायता, कर्तव्य अशा भावनांच मिश्रण त्या सीनमध्ये उतरवलं आहे.
आलियाने सेहमतच्या डोळ्यांतील भावना, तिची देहबोली आणि तिचे संवाद या सगळ्या गोष्टी भूमिकेत उतरवल्या.
आलियाचं अभिनय कौशल्य
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गली बॉय सुद्धा राजीच्या तोडीस तोड आहे. धारावीच्या वस्तीत राहणारी सफिना प्रामाणिक पण थोडी डोक्याने ढिली असते. आपल्या बॉयफ्रेंडच्या आसपास भटकणाऱ्या मुलींना ती म्हणते, "कोई मेरे बॉयफ्रेंड से कोई गुलुगुलु करेगा तो धोपटूऊँगी न."
पुढे 2022 मध्ये तिने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून अशीच खंबीर भूमिका साकारली. एकेठिकाणी सेक्स वर्कर म्हणून काम करणारी गंगू पुन्हा सगळ्या सेक्स वर्करची प्रमुख बनते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ज्या पद्धतीने आलिया म्हणते, "कमाठीपुरा में न कभी अमावस की रात नहीं होती है, पूछो क्यों. क्योंकि वहाँ गंगू रहती है. गंगू चाँद थी और चाँद ही रहेगी."
हे ऐकून आलिया गंगूच्या पात्राशी कधी एकरूप झाली हे कळतंच नाही. आलियाच्या या चित्रपटाने परदेशातही चांगली कमाई केली.
फिल्म क्रिटिक असलेले रामाचंद्रन श्रीनिवास सांगतात, "आलियाचे सगळेच चित्रपट चाललेत असं नाही. सडक-2, कलंक हे चित्रपट फ्लॉप झाले. गंगूबाईची कमाई आणि त्याच्यावर लावलेले पैसे बघता चित्रपट खास हिट मानता येणार नाही. पण आपल्या अभिनयाच्या बळावर लोकांना थिएटर मध्ये आणण्यात आलिया यशस्वी ठरली. लोक तिला नेपोटीजम वरून टार्गेट करतात. स्टुडंट ऑफ द इयरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला आलिया पेक्षाही कमी पैसे मिळाले होते.

फोटो स्रोत, FACEBOOK
साहजिकच ती महेश भट्टची मुलगी आहे म्हटल्यावर फरक पडतो. पण जेव्हा एखादा कलाकार चित्रपट करून आपलं स्टारडम बनवतो तेव्हा तो एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातो. जसं की आलियाने टू स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनियासारखे हिट चित्रपट दिले आणि स्टारडम मिळवलं. हायवेसारख्या चित्रपटात भूमिका करून तिने खूप रिस्क घेतली. तिच्या कारकिर्दीत तिने हरएक प्रकारचे रोल केले. तिच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत तिने मोठी झेप घेतली."
एस राजामौली यांच्या आरआरआर या ब्लॉकबस्टर चित्रपटात आलियाची छोटीशीच भूमिका होती. पण तिच्या अॅक्टिंग सोबतच तिच्या लोकप्रियतेचा फायदा पॅन इंडिया लेव्हलवर झाला.
आलिया नावाच्या ब्रॅण्डचा दबदबा..
फक्त अभिनयचं नाही तर बॉक्स ऑफिसची कमीसुद्धा महत्वाची असते. आलियाने या कसोटीवर सुद्धा स्वतःला सिद्ध केलं आहे. राजी या चित्रपटाने 200 कोटींहून जास्त कमाई केली होती. तेच गंगूबाईने सुद्धा 200 कोटींची उड्डाणे भरली.
जाहिरातींबद्दल बोलायचं झालं तर आलिया फिलिप्स, फ्रूटी, फ्लिपकार्ट, मान्यवर, मेक माय ट्रिप, कोकाकोल, लक्स सारख्या अनेक मोठ्या ब्रँडचा फेस राहिली आहे.
2014 पासूनचं तिने फोर्ब्स इंडिया 100 च्या यादीत आपलं स्थान भक्कम केलं आहे. 2021 मध्ये आलेल्या डफ आणि फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार, आलियाची ब्रँड व्हॅल्यू साधारण 681 लाख डॉलर इतकी आहे.

फोटो स्रोत, AFP
याशिवाय आलिया इटर्नल सनशाइन नावाच्या प्रोडक्शन हाऊसची मालकीण आहे. या बॅनर अंडर आलियाने डार्लिंग्स चित्रपटाची निर्मिती केली.
आलियाने 2020 मध्ये लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रॅण्ड सुरू केला. या ब्रॅण्डच नाव आहे एड-ए-मामा. आलियाने कोएग्जिस्ट नावाची कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी प्राणी आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर काम करते. आलियाने ब्युटी ब्रॅण्ड असलेल्या नायका कंपनीतही गुंतवणूक केली आहे.
इमेज गुरू दिलीप चेरियन सांगतात, "आलिया फक्त अभिनेत्रीचं नाही तर एक ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर आहे. सध्या आलिया चित्रपटांमध्ये टॉपला आहे. त्यामुळे तिला त्या क्षेत्राची चांगलीच समज आहे. त्यामुळे ती तिथे गुंतवणूक करते. तर दुसरीकडे तिला फॅशन आणि लाइफस्टाइलची समज असल्याने ती तिथेही गुंतवणूक करते. मला तर वाटतं तिला टेक प्रोडक्ट मध्ये पण रस असेल. ती फक्त ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनेल असं नाही तर ती त्यात भागीदारी पण करेल. तिने केलेली गुंतवणूक तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण ठरेल."
आलियाचे इन्स्टाग्रामवर कमीत कमी 6 करोड 95 लाख फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 84 लाख लोक तिला फॉलो करतात. ट्विटरवर तिला 2 कोटी 15 लाख लोक फॉलो करतात.
स्टिरिओटाइप तोडणारी आलिया
आलिया तिच्या सोशल मीडियावर आपल्या ब्रॅण्डसपेक्षा चित्रपटांशी संबंधित पोस्ट किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण शेअर करत असते. तिने तिच्या चाहत्यांना प्रेग्नेंन्सीची बातमी सोशल मीडियावरूनच दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 3
आपल्या करिअरच्या शिखरावर असलेल्या 29 वर्षीय आलियाने एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केलं. आता ती लवकरच आई होणार आहे. हिंदी चित्रपटाशी संबंधित हिरॉईन्समध्ये अनेक प्रकारचे स्टिरिओटाइप आहेत. आलिया, कतरिना, अनुष्का आणि दीपिका यांनी आपापल्या परीने हे स्टिरिओटाइप तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 4
बॉलिवूडमध्ये टॉप मध्ये असलेली आलिया आता हॉलिवूडमध्ये पोहोचली आहे. आलियाने हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचं शूटिंग पूर्ण केलं. वंडर वुमनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या गॅल गॅडोटसोबत आता ती स्क्रीन शेअर करणार आहे
कधीकाळी आलियावर जोक्स बनायचे...
2013 च्या 'कॉफी विथ करण' या शो मध्ये जनरल नॉलेजसंबंधी प्रश्नांची उत्तरं चुकीची दिल्यामुळे तिची 'डफर इमेज' तयार झाली. तिने भारताच्या राष्ट्रपतींचं नाव चुकीचं सांगितलं होतं. यानंतर आलियावर मिम्स बनू लागले.
करण जोहरने आलियाला लाँच केल्यावर त्याच्यावर नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीचा आरोप लागला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 5
अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्ध चतुर्वेदीने एका मुलाखतीत सहभागी झाले होते. तेव्हा अनन्या पांडे म्हणाली होती की, "माझे वडील अॅक्टर आहेत त्यामुळे मला मिळणाऱ्या संधीला मी कधीच नाही म्हटलं नाही. माझ्या वडिलांनी तर कधीच धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम केलं नाही. ते कधीच कॉफी विथ करणमध्ये आले नाहीत. लोकांना वाटतं आमच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या असतात. पण प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो."
यावर सिद्धांत म्हटला होता की, "आमची स्वप्न जिथं पूर्ण होतात तिथून यांचा स्ट्रगल सुरू होतो."
भलेही इंडस्ट्रीत यायला आलियाला तेवढी मेहनत घ्यावी लागली नसेल. मात्र या रेसमध्ये ती इतक्या जोरात पुढे जात आहे ज्यासाठी तिने मेहनत घेतली आहे.
बॉलीवूड ते थेट हॉलीवूड...
फिल्म क्रिटिक्स श्रीनिवास रामाचंद्रन सांगतात, "आलियाने करण जोहरच्या शो मध्ये खूपच भयानक उत्तर दिली होती. पण आज तिची उत्तर देण्याची पद्धत पाहिली तर विश्वास बसत नाही की ती तीच आलिया आहे. आपल्या चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं हे महत्त्वाचं असतं, आलियाने ते केलं. सुरुवातीला तिला ट्रोल केलं गेलं, पण त्यातूनच ती पुढे आली , तिने तिच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा केल्या. आता आलिया मोठी स्टार आहे. आज ती हॉलीवूड मध्ये पोहोचली आहे."

फोटो स्रोत, ALIA BHATT/TWITTER
10 वर्षापूर्वी एक स्टार किडपासून सुरू झालेला प्रवास बिजनेसवुमन ते आता थेट हॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचलाय.
हे सगळं करताना एकतर आलियाला पूर्ण आत्मविश्वास असेल किंवा तिच्या आयुष्यात गोंधळ निर्माण झाला असेल किंवा तिला अपयशाची भीती वाटली असेल.
पण जर तिला भीती वाटली असेल तर कदाचित सडक 2 च्या डायलॉग प्रमाणे तिने तिचा प्रवास सुरु ठेवला असेल.
"असली हिम्मत वो होती है जो डर के बावजूद जुटानी पड़ती है."
आलियाची चित्रपट कारकीर्द
1999- संघर्ष (बाल कलाकार)
2012- स्टुडंट ऑफ द ईयर
2014- हायवे ( फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड)
2016- उडता पंजाब ( फिल्मफेअर अवॉर्ड)
2018- राजी ( फिल्मफेअर अवॉर्ड)
2019- गली बॉय ( फिल्मफेअर अवॉर्ड)
2022- गंगूबाई काठियावाडी
2022- डार्लिंग्स ( प्रोड्यूसर)
ब्रँड आलिया
प्रोडक्शन हाऊस - इटर्नल सनशाइन
एड-ए-ममा - कपड्यांची कंपनी
कोएग्जिस्ट- इकोलॉजी प्लॅटफॉर्म
ब्युटी ब्रँड असलेली नायका मध्ये गुंतवणूक
भारतातील टॉप कंपन्यांची ब्रँड एम्बॅसिडर
फोर्ब्सच्या टॉप 10 मध्ये नाव (2019)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








