मुंबई : महिलेला मारहाण करणाऱ्या मनसे नेत्याची पदावरून हकालपट्टी

गणेशोत्सवाचा बॅनर लावण्यास विरोध केला म्हणून महिलेस मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याची पक्षाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आहे.
विनोद अरगिले असं मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असून ते मनसेचे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष होते.
मुंबई येथील कामाठीपुरा परिसरात गल्ली नंबर 8 मध्ये ही घटना 28 ऑगस्ट (रविवार) घडला होता. या घटनेचा व्हीडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हा प्रकार समोर आला.
विनोद अरगिले यांना पदावरून हटवत असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मनसेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय,
"मनसेत महिलांना नेहमीच आदर व सन्मान दिला जातो. काल मुंबादेवी विभागातील कामाठीपुरा परिसरात पक्षाचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. महिलांवरील हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही. पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत अरगिले यांना पदमुक्त केले आहे.
पोलिसांकडून अटक
वरील प्रकरण समोर आल्यानंतर नागपाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत विनोद अरगिले यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
विनोद अरगिले, राजू अरगिले आणि संदीप लाड अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
विभाग अध्यक्षांकडूनही स्पष्टीकरण
या प्रकरणावरून मनसेवर टीका होत असल्याचं निदर्शनास येताच मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे मनसे विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून या घटनेवर स्पष्टीकरण दिलं.

फोटो स्रोत, keshav mule
या व्हीडिओत ते म्हणतात, "गेल्या काही तासांपासून आमच्या मतदारसंघात घडलेल्या एका प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ मराठी वृत्तवाहिन्या दाखवत आहेत. मनसे उपविभाग अध्यक्ष विनोद आग्रिले यांचा महिलेसोबत वाद झाला, त्याचा हा व्हीडिओ आहे. पण त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे.
"सदर महिला संध्याकाळी सात ते आठ या वेळेत बेकायदेशीर फेरीवाले त्याठिकाणी बसवते. त्यांच्याकडून महिन्याला काही पैसेही घेते. त्याठिकाणी पक्षाचा बॅनर लावत असताना त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न महिलेने केला. त्याठिकाणी लावण्यात येत असलेला वासा त्या महिलेने ढकलण्याचा प्रयत्न केला. जर तो वासा पडला असता तर लोक जखमी झाले असते. त्यामुळे प्रसंगावधान राखून आग्रिले यांनी त्या महिलेला विरोध केला. त्यावेळी अनावधानाने हा प्रकार घडला आहे," असं मुळे म्हणाले.
"पण यादरम्यान केलेल्या मारहाणीचं पक्ष समर्थन करत नाही. तसंच महिला पक्षाच्या कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत होती. तेसुद्धा या व्हीडिओत दाखवलं जात नाही. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे स्पष्टीकरण व्हीडिओमार्फत देत आहोत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)