गणपती उत्सवाची नियमावली : या 12 गोष्टी लक्षात घ्या

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने एक नियमावली आणि मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होणार असल्याने तो पर्यावरणपूरक व्हावा असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
कोरोना काळाप्रमाणे यंदा कुठले निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. पण काही नियम मात्र आखून देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठीचे महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्व
- शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीची स्थापना करावी.
- आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक बाबींचा वापर करावा.
- थर्माकोल, प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा.
- गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावं.
- किंवा महापालिकेच्या गणेशमूर्ती संकलन केंद्रात मूर्ती जमा कराव्यात.
- घरगुती आणि सार्वजनिक उत्सवस्थळी जमा होणारं निर्माल्य कलशातच संकलित कारवं.
- प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा.
- सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सवस्थळी ध्वनिक्षेपकांचा आवाज संयमित ठेवावा.
- ध्वनीप्रदूषणाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
- या काळात मावा, माव्यापासून तयार केलेली मिठाई आणि खाद्यपदार्थ खरेदी करताना ती शिळी आणि खवट असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सार्वजनिक मंडपाच्या परिसरात आग विझविण्यासाठी सहज उपलब्ध होईल अशारितीने वाळू (रेती) बादल्या व पाण्याची व्यवस्था असावी.
- नैसर्गिक विसर्जनाचे ठिकाण, कूत्रिम तलावाचे ठिकाण आणि मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी उपस्थित असलेले मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्याकडेच आपण आपली श्रीगणेश मूर्ती द्यावी. त्यानंतर महापालिकेतर्फे मूर्तीचं विसर्जन केलं जाईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)







