व्यापाऱ्याचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली बिटकॉईनमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हाताला काम नाही या कारणातून खंडणी, अपहरण असे प्रकार होत असतात. एखाद्या व्यक्तीला ओलीस ठेऊन त्याबदल्यात पैसे घेतले जातात.
लखनौमध्ये एका व्यापाऱ्याला खंडणीखोरांनी ओलीस ठेवलं आणि बदल्यात बिटकॉईन देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खंडणीखोरांनी व्यापाऱ्याकडून एक कोटी अधिक रकमेची मागणी केली. ही रक्कम बिटकॉईनमध्ये द्या असंही सांगितलं. व्यापाऱ्याने बिटकॉईनची व्यवस्था केली.
बिटकॉईन मिळाल्यानंतरही खंडणीखोरांनी त्या व्यापाऱ्याला मारहाण केली आणि त्याला नदीकिनारी सोडून दिलं.
बीबीसीशी बोलताना त्या व्यापाऱ्याने कटू आठवणींबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "मारहाणीमुळे माझ्या तोंडावर सगळीकडे जखमा आहेत. मी तीन दिवस धड खाऊही शकलो नाही. तीन दिवस पाणी पिऊन काढले. त्यानंतर थोडं खाता येऊ लागलं. दोन्ही हातांना फ्रॅक्चर आहे. एका हाताला अनेक फ्रॅक्चर आहेत.
डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं पण त्यांनी शस्त्रक्रिया काही दिवस पुढे ढकलली. आता दुसरे डॉक्टर शस्त्रक्रिया करता येणार नाही असं म्हणत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डावा हात आता 80 टक्केच बरा होऊ शकतो".

"मी रक्तबंबाळ स्थितीत होतो. त्या लोकांनी लखनौ शहरातल्या कुर्सी रोड भागात मला मारहाण करून फेकून दिलं. एका टेम्पोवाल्याने मला मदत केली. त्याने मला इंजिनियरिंग कॉलेजपर्यंत सोडलं. तिथून रिक्षा करून मी घरी परतलो", असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्टला शाम यांना अपहरणकर्त्यांनी पकडलं.
16 ऑगस्टला पोलिसांनी संदीप प्रताप सिंह, रणवीर सिंह आणि विजय प्रताप सिंह यांना अटक केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अपहरणकर्त्यांनी बिटकॉईन वॉलेटमधून आपल्या बिटकॉईन अकाऊंटमध्ये 1 कोटी 3 लाख रुपये भरले. अपहरणकर्त्यांकडून एक पिस्तूल, काडतुसं, एक गाडी आणि 30 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. पोलिसांना बिटकॉईन व्यवहाराचे तपशीलही मिळाले आहेत.
लखनौ पूर्वचे डीसीपी प्राची सिंह यांनी यासंदर्भात निवेदन जारी केलं. 7 आणि 8 ऑगस्ट यादरम्यान पीजीआय ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
सकाळी व्यापाऱ्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता 364 अ (अपहरण करणं), 392 (लूटमार), 411 (संपत्तीचा चोरी), 323 (शारीरिक इजा करणं), 347 (जबरदस्तीने वसुली करणं), 386 (जीवाला धोका), 506 (धमकी देणं) आणि 3/25 शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
16 ऑगस्टला आरोपी अटकेत
16 ऑगस्टला तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचं प्राची सिंह यांनी सांगितलं.
या आरोपींना व्यापाऱ्याला ओलीस ठेऊन त्यांना सीतापूर इथल्या फार्महाऊसमध्ये ठेवलं.

फार्महाऊस इथेच व्यापाऱ्याच्या बिटकॉईन वॉलेटमधून त्यांनी आपल्या बिटकॉईन अकाऊंटमध्ये पैसे वळवले. बिटकॉईन रक्कम 1 कोटी 30 लाख एवढी होती.
आतापर्यंत पोलिसांनी 90 लाखापर्यंतची रक्कम व्यापाऱ्याला परत मिळवून दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सीतापूर फार्महाऊसचा मालिक वारूचाही पोलीस शोध घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं काम करत आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.
व्यापारी एका आरोपीला ओळखत होता- पोलीस
या अपहरण कटाचा तसेच बिटकॉईन व्यवहाराचा मास्टरमाईंड राजवीर याला व्यापारी ओळखत होता. त्याला व्यापाऱ्याच्या बिटकॉईन वॉलेटचीही पूर्ण माहिती होती. व्यापारी बिटकॉईन चलनाचा वापर करत आहे हे ठाऊक होतं.

फोटो स्रोत, Reuters
पोलिसांनी पकडू नये यासाठी आरोपींनी गाडीत उच्च न्यायालय अशी पाटी ठेवली होती. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं.
व्यापाऱ्याने सांगितलं की, "मारहाणीमुळे मला अतिशय वेदना होत आहेत. मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. अपहरणकर्त्यांकडून माझी सुटका करून देण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापेक्षा अधिक काय सांगू"?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








