अधीर रंजन चौधरी यांच्या 'राष्ट्रपत्नी' उल्लेखामुळे वाद

अधीर रंजन चौधरी

फोटो स्रोत, Hindustan Times

पश्चिम बंगालचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांना 'राष्ट्रपत्नी' असं संबोधल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेते विरोध करत आहेत आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आहेत.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून गेले तीन दिवस चौकशी चालू आहे. त्याविरोधात काँग्रेस नेते आंदोलन करत आहेत. बुधवारी (27 जुलै) याच आंदोलनाच्या दरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी एका चॅनलशी बोलताना मुर्मू यांचा उल्लेख 'राष्ट्रपत्नी' असा केला.

त्यांना राष्ट्रपती भवनात प्रवेश मिळत नाहीये. त्या संदर्भात चौधरींनी म्हटलं, "काल आम्हाला जाऊ दिलं नाही. आम्ही आजही जाऊ. राष्ट्रपती सगळ्यांच्या आहेत. राष्ट्रपतीजी, नव्हे राष्ट्रपत्नीजी, भारताच्या राष्ट्रपती सगळ्यांसाठी आहेत, मग आमच्यासाठी का नाहीत?"

त्यानंतर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी भाजपची माफी का मागू? मला माहिती आहे भारताचा राष्ट्रपती कोणीही असलं तरी ते सगळ्यांचेच असतात. हा शब्द एकदाच चुकून तोंडून निघाला आहे. ही चूक आहे. सत्ताधारी उगाच राईचा पर्वत करत आहेत."

"दोन दिवस आम्ही विजय चौकाकडे जातोय. तुम्ही कुठे जाताय अशी विचारणा आम्हाला रोज होते. आम्ही त्यांना सांगतो की, आम्ही राष्ट्रपती भवनाकडे जातोय आणि आम्हाला राष्ट्रपतींना भेटायचं आहे. काल माझ्याकडून चुकीने 'राष्ट्रपत्नी' असा शब्द निघाला तर मी काय करू? मला फाशी द्यायची असेल तर द्या. मी संबंधित पत्रकारांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते निघून गेले. मी त्यांना तेव्हाच सांगणार होतो की माझ्या तोंडून चुकीचा शब्द निघाला आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी भाजपची माफीही मागितली.

आता चौधरी यांनी या मुद्द्यावरून संसदेत बोलण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची वेळही मागितली आहे.

द्रौपदी मुर्मू पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहे. एनडीएने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी 25 जुलैला राष्ट्रपती पदाची शपथ घेतली

स्मृति इराणी काय म्हणाल्या?

या मुद्द्यावरून संसदेची कार्यवाही वारंवार स्थगित करण्यात आली.

स्मृति इराणी

फोटो स्रोत, Getty Images

या मुद्यावर बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं, "जेव्हा द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती म्हणून जाहीर झालं तेव्हापासून काँग्रेस पक्ष त्यांची घृणा करतोय. काँग्रेस त्यांना कठपुतली म्हणाला. एक आदिवासी महिला सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत हे काँग्रेसला अद्यापही पचनी पडलेलं नाहीये."

सोनिया गांधींनी काय म्हटलं?

त्याचवेळी अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीवर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, चौधरी माफी मागतील. या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, "त्यांनी माफी मागितली आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, हा महिलांचा जाणूनबुजून केलेला अपमान आहे. सोनिया गांधींनी राष्ट्रपती आणि देशाची माफी मागितली आहे.

भाजपा खासदार रमा देवी म्हणाल्या, "आम्ही हा अपमान अजिबात सहन करणार नाही. आम्ही एक देश म्हणून हे सहन करणार नाही. एक अदिवासी महिलेसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांनी माफी मागायला हवी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)