लवलीना बोरगोहाईं: ऑलिम्पिक पदक विजेतीचं दुःख – ‘माझा छळ होतोय’

लव्हलीना

फोटो स्रोत, ANI

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग खेळात कांस्य पदक जिंकणाऱ्या लवलीना बोरगोहाईंने इंग्लंडमध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या आधी, सोमवारी, 25 जुलैला आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला.

लवलीनाने ट्वीट करून आपली कैफियत मांडली आहे आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. तिने म्हटलंय की तिचा खूप छळ होतोय आणि याचा परिणाम तिच्या राष्ट्रकुल खेळांच्या तयारीवर होतोय.

लवलीनाच्या खासगी प्रशिक्षकांना अॅक्रेडेशिन मिळाले नव्हते त्यामुळे त्यांना क्रीडा संकुलात प्रवेश नाकारला होता. याचा तिला मनस्ताप सहन करावा लागला असं लवलीनाने म्हटलं आहे.

तिने ट्वीट करून लिहिलं, "मी अत्यंत दुःखाने सांगतेय की माझा खूप छळ होतोय. प्रत्येक वेळी माझे कोच - ज्यांनी मला ऑलिम्पिक मेडल आणण्यासाठी मदत केली, त्यांना सतत हटवून सतत माझ्या प्रशिक्षणात आणि स्पर्धेदरम्यान माझा छळ होतोय. यातल्या एक कोच संध्या गुरुंग यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला आहे."

लवलीनाच्या तक्रारीनंतर क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप करत तिच्या कोच संध्या गुरुंग यांना अॅक्रेडेशन मिळवून दिले आहे. लवलीनाने मांडलेला प्रश्न सुटला असला तरी खेळाडूंना कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी थांबलं ट्रेनिंग

वृत्तसंस्था पीटीआयनुसार भारताची बॉक्सिंग टीम आर्यलंडमध्ये आपलं प्रशिक्षण पूर्ण करून रविवारी, 24 जुलैला बर्मिंगहॅमस्थित स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये पोचली.

पण लवलीनाच्या खाजगी कोच संध्या गुरुंग अॅक्रेडिशन नसल्यामुळे स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करू शकल्या नाहीत. यावर लवलीनाने लिहिलं की, "माझ्या कोच संध्या गुरूंग स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये येऊ शकल्या नाहीत. त्यांना प्रवेश मिळत नाहीये. माझ्या दुसऱ्या कोचलाही भारतात परत पाठवलं गेलं. अशा परिस्थितीत मी खेळांवर कसं लक्ष केंद्रित करू?"

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लवलीनाने असाही आरोप केलाय की इस्तंबुल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही तिला अशाच प्रकारच्या छळाचा सामना करावा लागला.

तिने लिहिलं, "मला समजत नाहीये की मी मी खेळांवर कसं लक्ष केंद्रित करू? याच गोष्टीमुळे माझी वर्ल्ड चॅम्पियनशिपही खराब झाली."

लव्हलीना

फोटो स्रोत, ANI

तिने पुढे म्हटलं की, "या राजकारणामुळे मी राष्ट्रकुल स्पर्धेतली कामगिरी खराब करू इच्छित नाही. मला आशा आहे की मी या राजकारणाला भेदून माझ्या देशासाठी मेडल आणेन. जय हिंद."

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने लवलीनाच्या तक्रारीवर म्हटलंय की एक्रेडिशनची प्रक्रिया इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या हातात आहे आणि आशा व्यक्त केली की लवकरच या मुद्द्यावर तोडगा निघेल.

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने पुढे म्हटलं की, "इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि आम्ही संध्या गुरुंग यांच्या अॅक्रेडिशन प्रक्रियेवर सतत काम करत आहोत. आज-उद्यात हे काम पूर्ण होईल."

भारत सरकारच्या खेळ मंत्रालयाने आपली बाजू मांडत म्हटलं की, "आम्ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला आग्रह केला आहे की त्यांनी तातडीने लवलीनाच्या कोचची अॅक्रेडिशन प्रक्रिया पूर्ण करावी."

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव हेमंत कालिता यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हटलं की, "आम्ही आधीच सगळी नावं दिली होती. पण यात कोटा सिस्टिम आहे. खेळाडूंच्या संख्येनुसार 25 टक्के कोटा निर्धारित आहे. आमच्याकडे चार जागा आहेत ज्यात कोच आणि डॉक्टर यांचा समावेश आहे."

"आम्ही आयओएला आग्रह केला तेव्हा त्यांनी कोटा वाढवून आठ केला. पण यातले चार लोक स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहातील तर चार बाहेर राहातील. बाहेर राहाणारे दिवसा व्हिलेजमध्ये येऊ शकतात पण रात्री त्यांना बाहेर यावं लागेल."

लवलीनाने आपल्या ट्वीटमध्ये ज्या दुसऱ्या कोचबद्दल उल्लेख केला त्यांचं नाव एमी कोलेकर आहे. कोलेकरांचं नाव यादीत नव्हतं पण ते आर्यलंडमध्ये लवलीनाच्या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)