बॉलिवूड: आठवड्याभरात काय काय झालं? - पाहा फोटो गॅलरी

बॉलीवुड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिशा पाटनी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी जुहू येथील सन-एन-सँड हॉटेलमध्ये आपला सिनेमा विलेन रिटर्न्सचं प्रमोशन करताना. दिशा पाटनीसोबत या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत आहेत.

तारा सुतारिया

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, तारा सुतारिया

अभिनेत्री तारा सुतारिया 'एक विलेन रिटर्न्स' या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं सध्या प्रमोशन सुरू आहे.

दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या सिनेमाचा हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि शद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.

जान्हवी कपूर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरचं गुरुवारी (22 जुलै) मुंबईतील वर्सोवा याठिकाणी टिपलेलं हे छायाचित्र.

बॉलीवुड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जॅकलीन फर्नांडीस

जॅकलीन फर्नांडिसने अभिनेता धनुषचा आगामी थ्रीलर सिनेमा 'द ग्रे मॅन'च्या विशेष स्क्रिनींगला हजेरी लावली. यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणारा रोहित शेट्टीचा सिनेमा 'सर्कस'मध्ये जॅकलीन रणवीर सिंह, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्यासोबत दिसेल.

बॉलीवूड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शमीता आणि शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी वांद्रे येथील एका हॉटेलबाहेर.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

अभिनेता शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतसह रुसो ब्रदर्स यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. रितेश सिधवानी यांनी ही पार्टी आयोजित केली होती. रुसो ब्रदर्स आपला सिनेमा 'द ग्रे मॅन'च्या प्रमोशनसाठी सध्या भारतात आहेत. या सिनेमात भारतीय अभिनेता धनुषनेही काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे.

बॉलीवुडः हफ़्ते भर की हलचल

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विजय देवरकोंडा, रणवीर सिंह आणि अनन्या पांडे

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रणवीर सिंह सध्या आपला आगामी सिनेमा 'लायगर'चं प्रमोशन करत आहेत. लायगर सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडे सुद्धा उपस्थित होती.

दिग्ददर्शक पुरी जगन्नाथ यांचा हा सिनेमा असून यात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि माइक टायसन पहिल्यांदाच सोबत दिसतील. हा सिनेमा 25 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, रणबीर कपूर

शमशेरा सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त अभिनेता रणबीर कपूर.

शमशेरा सिनेमा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शमशेरा सिनेमा

22 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या शमशेरा सिनेमात संजय दत्त, रणबीर कपू, वाणी कपूर, रोनित रॉय, सौरभ शुक्ला, इ. कलाकारांनी काम केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)