समदं ओक्के न्हाई...शहाजी पाटील यांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि छतच कोसळलं

आकाशवाणी आमदार निवास

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय' या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

त्यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीत बुधवारी (6 जुलै) मध्यरात्री मोठा अपघात झाला. मुंबईतली सर्व कामं आटोपून शहाजीबापू पाटील रात्री उशीरा त्यांच्या खोलीवर पोहोचले.

तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांच्या खोलीचं छप्पर खाली कोसळलं.

महत्त्वाचं म्हणजे हे छप्पर शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळलं आहे.

त्यांच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "बुधवारी रात्री ते रुमवर आले त्यांनी दरवाजा उघडला आणि स्लॅब खाली कोसळला. ते थोडक्यात बचावले. त्यानंतर आमदार निवासात रात्री दुसरी खोली आम्ही मॅनेज केली. पण रात्रभर आम्हाला खूप त्रास झाला."

आकाशवाणी आमदार निवास

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडली आहे. यापूर्वी मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या.

कोण आहेत शहाजीबापू पाटील?

शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.

1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड

"शहाजीबापू यांच्या डोक्यात कोणत्या गावात, कोणत्या भाषेत, काय बोलायचं स्क्रिप्ट तयार असते. याचा अनुभव त्यांच्या या ठरवून व्हायरल केलेल्या कॉलमध्ये येतो आहे," असे मत सोलापूर लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे व्यक्त करतात.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते म्हणतात, "शहाजीबापू पाटील यांची कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड आहे. आजपर्यंत ते फक्त दोनच निवडणुका जिंकले आहेत. पण त्यांच्या सभांना मात्र कायम गर्दी होत आली आहे. आपल्या भाषणात गावरान भाषेत किस्से सांगत, अनेक दाखले देत ते श्रोत्यांचा टाळ्या-शिट्या मिळवत असतात."

गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत

सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.

आकाशवाणी आमदार निवास

1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.

काँग्रेस ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी

आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूला करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.

सलग चार पराभव

अखेर 2014 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असताना युतीच्या वाटपात जागा

शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.

शहाजी बापू पाटील

फोटो स्रोत, Facebook

सलग चार पराभव पचवल्यानंतर 2019 मध्ये ते फक्त 674 मतांनी विजयी झाले. 1990 पासून आजपर्यंत तब्ब्ल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे दोन्ही विजय निसटते आहेत.

1995 मध्ये फक्त 192 तर 2019 मध्ये फक्त 674 मतांनी त्यांना विजय मिळवता आला आहे. "त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता." असे मत सचिन जवळकोटे व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)