भावना गवळींची प्रतोदपदावरुन हकालपट्टी, राजन विचारेंना संधी

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhavana Pundlikrao Gawali
भावना गवळी यांची लोकसभेतील मुख्य प्रतोदपदावरुन तात्काळ हकालपट्टी करुन त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची नेमणूक करावी असं पत्र संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लिहिलं आहे.
राजन विचारे हे शिवसेनेचे ठाणे मतदारसंघातून निवडून जाणारे खासदार आहेत.

फोटो स्रोत, TWITTER
खासदार राजन विचारे एकनाथ शिंदे यांचे मित्र आणि अत्यंत जवळचे आहेत. शिंदे गटाने यांनी बंड पुकारल्यापासून ते नॅाट रिचेबल आहेत. उद्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला राजन विचारे उपस्थित नव्हते. त्यामुळे शिंदेंच्या जवळच्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांनी मुख्य व्हिप बनवल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. राजकीय विश्लेषक सांगतात राजन विचारे एकनाथ शिंदे यांचं मित्र जरी असले तर प्रत्येकाची राजकीय गणितं वेगळी असतात.वरिेष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "राजन विचारे यांची व्हिप म्हणून नियुक्ती करून आनंद दिंघेंचा एक शिवसैनिक पक्ष सोडून गेला पण दुसरा कट्टर शिवसैनिक आमच्यासोबत आहे असं दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असू शकतो." ठाण्याचे दोन वेळा खासदार असलेले राजन विचारे, शिंदे यांच्याप्रमाणेच आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झाले आहेत. आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक आहेत. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता विचारे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे त्यांना रिवॅार्ड म्हणूनही व्हिप बनवण्यात आलं असावं." सूर्यवंशी पुढे म्हणाले.
आनंद दिघेंपासून ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर वर्चस्व निर्माण केलं. एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांचा राजकीय प्रवास जवळून रहाणारे राजकीय विश्लेषक कैलाश महापदी सांगतात, राजन विचारे यांची व्हिप म्हणून नियुक्ती मागे सर्वात मोठं कारण आहे उद्दव ठाकरेंची ठाणे राखण्यासाठीची धडपड. ते पुढे सांगतात. "यातून शिवसेनेने शिंदे यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्यासोबत अनेक लोक आले पण ठाण्याचा खासदार शिवसेनेसोबत आहे." राजन विचारेंची खासदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यांच्यापेक्षा अनेक सिनिअर नेत्यांना वगळून विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाश महापदी पुढे म्हणाले, "शिंदे आणि विचारे यांचं राजकारण समकालीन आहे. त्यांच्यात विस्तवही जात नव्हता. कालांतराने राजकीय फायद्यासाठी विचारे यांनी शिंदेंशी पॅालिटीकल अॅडजेस्टमेंट केलं." शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून राजन विचारे नॅाटरिचेबल आहेत. ते शिंदे गटासोबत जातील अशी चर्चा आहे. पण विचारे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. विचारे यांच्याशी याबाबत बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकलेला नाही.
शिवसेना खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने समन्स बजावलं होतं.
शिवसेना खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होतं.
या कथित गैरव्यवहारप्रकरणी सईद खान हे भावना गवळी यांचे निकटवर्तीय ED च्या अटकेत आहेत. त्याची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत.
ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं षड्यंत्र विचारपूर्वक रचलेलं होतं. ट्रस्टमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी हे करण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ईडीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ट्रस्टमधून अफरातफर करण्यात आलेल्या पैशातून विकत घेण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
ईडीने 11 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधितांविरोधात मनी लॅांडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी ईडीनं भावना गवळी यांना तीन समन्स बजावली आहेत. पण त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत.
प्रकरण काय?
भावना गवळी यांनी शिक्षण संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटींची चोरी झाल्याची पोलीस तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळींच्या विरोधात ट्वीट केलं होतं.
भावना गवळी यांच्याकडं एवढी मोठी रक्कम कुठून आली, याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्यानंतर सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
ऑगस्ट महिन्यात ईडीने शिवसेना खासदार भावना गवळींच्या 5 संस्थांवर छापेमारी केली.
ईडीनं वाशिम जिल्ह्यातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएमएस कॉलेज, बालाजी सहकारी पॉलिटीकल बोर्ड, भावना अॅग्रो प्रॉडक्ट्स या संस्थांवर छापे मारून चौकशी सुरू केली.
भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या छाप्यानंतर भाजपनं जुलमी सत्र सुरू केलंय, शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया गवळी यांनी दिली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








