एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित या 5 बातम्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी गुरुवारी (30 जून) संध्याकाळी राजभवनावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदावर बसतील, अशी शक्यता होती. पण त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना हे पद देण्यात आलं.
मुख्यमंत्रिपद शिंदे यांना मिळाल्यानंतर राज्याचं राजकीय समीकरण वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षात तर या बंडामुळे प्रचंड मोठा गोंधळ माजला आहे.
या राजकीय घटनाक्रमाबाबत खालील पाच बातम्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजेत.
1. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून भाजपने त्यांचे पंख छाटले आहेत का?
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद घोषित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतः सरकारमध्ये सहभागी होणार नाही असं सांगून टाकलं. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मात्र वेगळा निर्णय घेतला.
पण शपथविधीला अर्धा तास होण्याआधी भाजपच्या अध्यक्षांनी ट्वीट करत देवेंद्र यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आदेश दिले.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह म्हणाले. हे असं का घडलं? यामागे फडणवीस यांच्या विरोधात काही डावपेच आहेत का?
2. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची कारणं काय?
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून 'पुन्हा येतील', असं जवळपास सर्वांनीच गृहित धरलं होतं.

पण देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसवलं आहे. याची कारणे काय असू शकतात?
3. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : शिवसेनेची गोची की सरशी?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यंत्री झाले आणि महाराष्ट्र अचंबित झाला.

जसं हे महाराष्ट्राला अचंबित करणारं आहे. तसंच ते शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना तोंडात बोटं घालायला लावणारं आहे.
4. एक राजकीय हत्या आणि शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचा विजय
एका हत्येमुळे 52 वर्षांपूर्वी शिवसेनेला पहिला आमदार मिळाला होता, हे वाचायला थोडं विचित्र वाटत असलं, तरी हे खरंय.

फोटो स्रोत, Getty Images
कारण एका हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेचा पहिला आमदार जिंकला होता आणि त्या हत्येचा आरोपही शिवसेनेवर करण्यात आला होता.
त्यामुळे शिवसेनेच्या पहिल्या आमदाराच्या निवडीची गोष्ट सांगताना त्या हत्येची घटना समजून घेणं आवश्यक आहे.
5. हॉटेलमध्ये ठेवलेले आमदार जेव्हा धोतरावरच स्विमिंग पूलमध्ये उतरले...
सुरत असो वा गुवाहाटी किंवा गोवा, सगळीकडे अलिशान हॉटेलमधील आमदारांचा मुक्काम हे काही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात नव्याने घडत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु, या हॉटेलमधील किस्से मात्र अनेकदा फारच रंजक असतात.
असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. हा किस्सा घडला होता, विलासराव देशमुखांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हाचा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)













