एकनाथ शिंदे बंड : 8 मंत्री आणि 39 आमदार, शिंदे गटातील आमदारांची 'ही' आहे आतापर्यंतची यादी

एकनाथ शिंदे

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडात सहभागी होत असलेल्या आमदारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसतेय.

कालपर्यंत शिवसेनेच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होत असलेले कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंतही गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायचं नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात बंडखोरी केलीय.

एकनाथ शिंदे यांच्या गोटातल्या आमदारांची संख्या 47 झालीय. यात शिवसेनेचे 38 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 8 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत.

शिंदे गटातील दोन आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख हे मात्र परतले आहेत.

विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंडाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेसोबत काही आमदार गुजरातमधील सुरतमध्ये आणि तिथून गुवाहाटीला गेले. सुरुवातीला 20-25 संख्या असलेले आमदार 40 च्या वर गेले आहेत.

आमदार

फोटो स्रोत, Eknathshindeoffice

एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या आमदारांच्या यादीनुसार शिवसेनेचे एकूण 37 आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर 9 अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार -

1) एकनाथ शिंदे (मंत्री)

2) अनिल बाबर

3) शंभूराजे देसाई (मंत्री)

4) महेश शिंदे

5) शहाजी पाटील

6) महेंद्र थोरवे

7) भरतशेठ गोगावले

8) महेंद्र दळवी

9) प्रकाश अबिटकर

10) डॉ. बालाजी किणीकर

11) ज्ञानराज चौगुले

12) प्रा. रमेश बोरनारे

13) तानाजी सावंत

14) संदीपान भुमरे (मंत्री)

15) अब्दुल सत्तार नबी

16) प्रकाश सुर्वे

17) बालाजी कल्याणकर

18) संजय शिरसाठ

19) प्रदीप जयस्वाल

20) संजय रायमुलकर

21) संजय गायकवाड

22) विश्वनाथ भोईर

23) शांताराम मोरे

24) श्रीनिवास वनगा

25) किशोरअप्पा पाटील

26) सुहास कांदे

27) चिमणआबा पाटील

28) सौ. लता सोनावणे

29) प्रताप सरनाईक

30) सौ. यामिनी जाधव

31) योगेश कदम

32) गुलाबराव पाटील (मंत्री)

33) मंगेश कुडाळकर

34) सदा सरवणकर

35) दीपक केसरकर

36) दादा भुसे (मंत्री)

37) संजय राठोड

38) उदय सामंत (मंत्री)

एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार

1) बच्चू कडू (मंत्री)

2) राजकुमार पटेल

3) राजेंद्र यड्रावकर (मंत्री)

4) चंद्रकांत पाटील

5) नरेंद्र भोंडेकर

6) किशोर जोरगेवार

7) सौ.मंजुळा गावित

8) विनोद अग्रवाल

9) सौ. गीता जैन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)