आदित्य ठाकरे : 'अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी योगी आदित्यनाथ यांच्याकडे जागा मागणार'

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, facebook

आदित्य ठाकरे यांचं आज (15 जून) सकाळी अयोध्या येथे आगमन झालं. त्यानंतर त्यांनी येथील हॉटेल पंचशीलमध्ये पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आम्ही अयोध्या दौरा केल्यानंतर राम मंदिर खटल्याला चालना मिळाली आणि एका वर्षात त्याचा निकाल आला.

हा कोणताही राजकीय दौरा नाही. मी केवळ दर्शनासाठी आलो आहे.

अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी योगी आदित्यनाथ यांच्याकडे जागा मागणार आहोत. तशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यासाठी आवश्यक असलेला पत्रव्यवहार उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत करणार आहेत. तसंच ते फोनवरूनही योगी यांच्याशी संवाद साधणार आहेत, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

महाराष्ट्रातून अनेक नागरीक अयोध्येत दर्शनासाठी येतात. त्यांची राहण्याची सोय व्हावी, त्यासाठी महाराष्ट्र सदन बांधण्यात येणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम कसा आहे?

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (15 जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत.

ते रामजन्मभूमीचं दर्शन घेतील तसंच संध्याकाळी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्येमध्ये दिवसभराचा कार्यक्रम आहे.

बुधवार (15 जून) सकाळी अकरा वाजता आदित्य ठाकरे हे लखनऊ एअरपोर्टवर पोहचतील. तिथून ते अयोध्येसाठी रवाना होतील.

दुपारी इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. नंतर हनुमान गढी तसंच राम जन्मभूमीचं दर्शन घेतील. संध्याकाळी लक्ष्मण किलाला आदित्य भेट देतील. त्यानंतर शरयू किनाऱ्यावर आरती केल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा याआधी 10 जूनला निश्चित करण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीमुळे अयोध्या भेटीची तारीख बदलून 15 जून करण्यात आली.

व्हीडिओ कॅप्शन, आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा नेमका कशासाठी केला?

दरम्यान, आदित्य यांच्या दौऱ्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईहून उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊतही आदित्य यांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे जिथे जिथे जाणार आहेत, त्या-त्या भागांमध्ये जाऊन राऊत यांनी पाहणी केली.

आदित्य ठाकरेंप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता.

"उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही," असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. नंतर पायावर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे राज यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता.

ब्रिजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांचं मात्र स्वागत केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)