नागालँड गोळीबार प्रकरण : 'जवानांनी खाण कामगारांना अतिरेकी समजून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला'

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या ईशान्यकडील नागालँड राज्यात मागील वर्षी लष्कराने केलेल्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नागालँड पोलिसांनी लष्कराच्या 30 जवानांवर आरोप ठेवले आहेत.
पोलिसांनी आपल्या तपासात म्हटलं आहे की, "स्पेशल फोर्सच्या जवानांनी खाण कामगारांना अतिरेकी समजून त्यांच्यावर 'अंदाधुंद गोळीबार' केला."
गेल्या डिसेंबरमध्ये म्यानमार सीमेजवळ झालेल्या गोळीबारात सहा खाण कामगार ठार झाले होते.
या घटनेनंतर रागाच्या भरात गावकऱ्यांनी सैनिकांवर हल्ला केला. यात आठ नागरिक आणि एक जवान देखील शहीद झाला होता.
मोन जिल्ह्यातील ही घटना म्हणजे नागालँडमधील अनेक वर्षांतील सर्वांत मोठा हिंसाचार होता. मोन जिल्हा हा नागा समूह एनएससीएन (के) आणि उल्फा या स्थानिक अतिरेकी संघटनांचा बालेकिल्ला आहे.
या घटनेनंतर भारतीय लष्कराने माफी मागितली असून स्वत: चौकशीचे आदेश दिले आहेत.
आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) रद्द करण्यासाठी आंदोलक सरकारवर दबाव आणत आहेत. या कायद्याने सैन्याला व्यापक अधिकार मिळाले आहेत. या कायद्यान्वये जर सैनिकांनी चुकून नागरिकांची हत्या केली तर सैनिकांना खटल्यापासून संरक्षण मिळते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








