स्वतःशीच लग्न करणारी क्षमा म्हणते 'मी स्वतःला लैंगिकदृष्ट्या सुखी कसं ठेवेन हा माझा वैयक्तिक प्रश्न'

फोटो स्रोत, Instagram
नवरीने मेंहदी लावली, हळदीचा समारंभ झाला, सप्तपदी सर्वकाही अगदी पारंपरिक पद्धतीने पण या लग्नाचं एक वैशिष्ट्य आहे इथं दुसरा जोडीदार नाही. इथे नवरी स्वतःच स्वतःच्या विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिचा वेगळा कुणी जोडीदार नाही तर ती स्वतःच आहे. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आणि स्वतःवर प्रेम करण्याची शपथ घ्यायची यालाच सोलोगॅमी म्हणतात आणि क्षमाने तेच केलं आहे.
क्षमा बिंदू ने अखेर स्वत:शीच लग्न केलं आहे. तिच्या लग्नाला अनेकांनी विरोध केला होता. म्हणून एका घरगुती समारंभात तिने स्वत:शी लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसंच प्रसारमाध्यमांना तिने घरी येण्यास मनाई केली होती. पण लग्नानंतर तिने माध्यमांशी बातचीत केली.
लग्नानंतर एएनआयशी बोलताना क्षमा म्हणाली की, "ही माझी स्वतःची लैंगिक गरज आहे. मी लग्नानंतर स्वतःला लैंगिकदृष्ट्या सुखी कसं ठेवेन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीला हा प्रश्न देखील विचारणे हे वाह्यातपणाचे लक्षण आहे."
तिच्या लग्नाला भाजपने विरोध केला होता. त्यामुळे तिने घरातल्या घरात लग्न केलं. यावेळी कोणतेही पुरोहित वगैरे उपस्थित नव्हते. आधीच्या पुरोहिताने ऐनवेळी माघार घेतली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी तिने स्वत:शी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावरून अनेक उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं होतं.
क्षमा 24 वर्षांची असून ती समाजशास्त्राची विद्यार्थिनी आहे. यासोबतच ती ब्लॉगरही आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
ती म्हणते, "लोक मला बऱ्याचदा सांगायचे की मी परफेक्ट मॅच आहे. यावर मी त्यांना हो म्हणतेचं पण म्हणून मी स्वतःची निवड केल्याचंही सांगते."
क्षमा सांगते की स्वत:सोबत लग्न केल्यानंतर ती संपूर्ण आयुष्य स्वतःवरचं प्रेम करण्यात घालवेल.

फोटो स्रोत, Instagram
ती म्हणते, "स्वतःशीचं लग्न करणं म्हणजे स्वतःला दिलेलं एक वचन आहे. स्वतःसाठी नेहमीचं उपलब्ध असण्याचं वचन. हे असं वचन आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी इच्छिलेलं आयुष्य आणि लाइफस्टाइल तुमच्या प्रगतीसाठी पोषक असेल. यातून तुम्ही जिवंत आणि आतून समाधानी जीवन जगाल."

फोटो स्रोत, Instagram
सोलोगॅमी कधी सुरू झालं?
यावर क्षमा सांगते, "माझ्या प्रत्येक पैलूचा मी मनापासून स्वीकार करते हे दाखवण्याची ही पद्धत आहे. विशेषतः माझ्यात असलेल्या असमर्थता मग त्या शारीरिक असो, मानसिक असो किंवा काहीही असो, त्या स्वीकारणे. स्वतःशीचं लग्न करणे ही माझ्यासाठी कुठंतरी खोलवर रुजलेली भावना आहे. यातून मला सांगायचं आहे की मी स्वत:ला स्वीकारलं आहे... अगदी आहे तशा पद्धतीने."

फोटो स्रोत, Kshama Bindu
क्षमा सांगते की, तिच्या या निर्णयामध्ये तिचं कुटुंब तिच्यासोबत आहे. मित्रमंडळींसह कुटुंब ही तिच्या या लग्नाला उपस्थित राहणार आहे.
ती पुढे सांगते, "माझी आई मला म्हणाली, अरे व्वा! तू नेहमीच काहीतरी नवा विचार करतेस. माझे पालक अगदी मोकळ्या मनाचे आहेत. ते मला म्हणाले की तुझा यात आनंद आहे ना तर तू तेच करावंस."
स्वतः सोबतचं लग्न केल्याची बातमी मी जवळपास 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकली होती. कॅरी ब्रॅडशॉ (अमेरिकन मालिका सेक्स अँड द सिटी मधील फेमस कॅरेक्टर) यांनी त्याचा उल्लेख केला होता. पण हा शो कॉमेडी ड्रामा होता.

फोटो स्रोत, Instagram
रिपोर्टनुसार, मागील काही वर्षांत असे शेकडो विवाह झाले आहेत. सिंगल महिला सोलोगॅमीमध्ये आघाडीवर आहेत. या नववधू हातात पुष्पगुच्छ घेऊन पारंपरिक लग्नाच्या पोशाखात लग्नासाठी जातात. अनेक वेळा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्यांच्यासोबत असतात.
हे सर्वजण त्यांना चिअरअप करतात.
पण ही गोष्ट केवळ लग्नापुरती मर्यादित नाही. अशाच एका प्रकरणात 33 वर्षीय ब्राझिलियन मॉडेलने स्वतःशीच लग्न करून स्वतःलाच घटस्फोटही दिला होता.
सोलोगॅमीमुळे व्यवसायाच्या संधीही वाढल्या आहेत. यासाठी एक किट मिळतं ज्यात अंगठी आणि इतर वस्तू असतात.
आता अशा गोष्टी भारतात क्वचितचं ऐकायला मिळतात हे नाकारता येत नाही. त्यामुळे क्षमाच्या लग्नाची बातमी संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत
जेव्हा मी मेंटल हेल्थ एक्सपर्टशी बोलले तेव्हा त्यांनी अशा लग्नावर आश्चर्य व्यक्त केलं.
चंदीगडमधील पीजीआयएमईआर हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागातील माजी डीन आणि प्रोफेसर असलेल्या डॉ. सविता मल्होत्रा सांगतात, 'माझ्या मते ही एक अतिशय विचित्र संकल्पना आहे.'
त्या म्हणतात, "प्रत्येकजणच स्वत:वर प्रेम करतो. स्वत:वर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नसते. ते आपल्या सर्वांमध्ये आधीपासूनच असतं. आणि प्रश्न जेव्हा लग्नाचा असतो, तेव्हा ते दोन व्यक्तींना एकत्र आणतं."

फोटो स्रोत, Instagram/Kshama Bindu
क्षमाच्या या बातमीने सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलंय. क्षमाने इतरांसमोर आदर्श ठेवलायं म्हणून काही लोक तिची स्तुती करतायत तर काही लोकांचा दृष्टिकोन याहून उलटा आहे.
जर दुसरी व्यक्तीच नसेल तर लग्नाची काय गरज आहे, असा सवाल एका महिलेने ट्विटरवरून केलाय. तर दुसरा एक व्यक्ती ट्विट करतो की, तिला तिच्या कौटुंबिक जबाबदारीपासून पळायचं आहे.
काही लोकांनी तर या प्रकाराला दुर्दैवी म्हटलंय.
क्षमा फक्त तिच्या टीकाकारांना एवढंच सांगू इच्छिते की, "मी कोणत्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायचं, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. सोलोगॅमी लोक ही नॉर्मल असतात हे मला सिद्ध करायचं आहे म्हणून मी स्वतःशी लग्न करते आहे.
मला लोकांना फक्त एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही जन्माला येताना एकटेच आलात आणि तुम्हाला एकट्यालाच जावं लागतं. मग तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम कोण करतं? जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हाला सांभाळायला ही तुम्हीच असता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








