डिटॉक्स डाएट म्हणजे काय? त्यामुळे नक्की काय होतं?

डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, एम. मणिकंडन
    • Role, बीबीसी तमीळ

सध्या लोक वेगवेगळे डाएट्स करत असतात. डिटॉक्स डाएट हा त्यापैकीच एक प्रकार.

आहारतज्ज्ञ राम्या रामचंद्रन यांनी डिटॉक्स डाएट कशासाठी उपयुक्त आहे आणि त्याचे परिणाम काय असतात याविषयी माहिती दिली आहे.

1905 च्या सुमारास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी या डाएटची संकल्पना पुढे आली. 1971 मध्ये या पद्धतीमध्ये बदल करून शरीरातून विशिष्ट विषारी पदार्थ काढून टाकण्यात येऊ लागले.

1977 मध्ये हा डाएट पर्यायी उपचारपद्धती मध्ये बदलण्यात आला. सुरुवातीला ही एक वैद्यकीय प्रक्रिया होती आणि ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जात होती

डिटॉक्स डाएटमध्ये कोणता धोका असतो?

सुरुवातीच्या टप्प्यात डिटॉक्स डाएटचे काही फायदे मिळतात. उदाहरणार्थ- यात कॅलरीज कमी होतात आणि त्यामुळे वजन कमी करता येते. मात्र, एखाद्या व्यक्तीने डिटॉक्स डाएट सुरूचं ठेवल्यास रक्तातील अॅसिडिटी वाढू शकते.

काही प्रकरणांमध्ये यामुळे कोमा आणि मृत्यू होऊ शकतो.

शरीरातील टॉक्सिन म्हणजे काय? त्यांच्यामुळे रोगांना निमंत्रण मिळतं का?

टॉक्सिन म्हणजे शरीरातील विषारी घटक. मात्र सर्वच रोगांमागे हे एकमेव कारण आहे असं नाही. जीवाणू आणि विषाणू यांसारखी बरेच घटक रोगांना बळी पडण्यास कारणीभूत असतात.

डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

डिटॉक्स उत्पादने शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात का?

अनेक डिटॉक्स उत्पादने शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचा दावा करतात. पण वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेले नाही.

सेलिब्रिटीज या उत्पादनांच्या जाहिराती करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांचे सेवन केल्यास अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

आपण शरीरातील विषारी घटक काढून टाकावे का?

शरीरात असणारे विषारी घटक कृत्रिमरित्या काढून टाकण्याची गरज नसते. आपले अवयव योग्यरित्या कार्य करत असल्यास हे घटक काढून टाकण्यासाठी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उत्पादनांची आवश्यकता नाही.

आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी आपले अवयव 24 तास काम करतात.

डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

उदाहरणार्थ- आपले शरीर विषारी पदार्थांचे विघटन करते. ते विरघळतात आणि लघवीद्वारे बाहेर फेकले जातात. यापेक्षा चांगली अशी दुसरी कोणतीही डिटॉक्स पद्धत नाही.

आपली त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती आणि यकृत देखील विषारी पदार्थ बाहेर फेकतात.

कोणत्या पदार्थांमुळे विषारी घटक तयार होतात?

आपण खाल्लेले कोणतेही अन्न विषारी ठरू शकते.

पाणी, मीठ, ट्यूना फिश यापैकी कोणतेही पदार्थ विषारी होऊ शकतात. मात्र आपलं शरीर यामुळे निर्माण होणारे विषारी घटक स्वतःच बाहेर टाकतात. जर आपण याचा विचार केला तर आपल्याला विविध आहार पद्धतींची आवश्यकता नाही.

डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

मात्र असं असूनही जर एखाद्या व्यक्तीला डिटॉक्स डाएट करायचं असेल तर मग त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं करावं.

डिटॉक्स डाएट कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त नुकसानकारक ठरू शकतो?

लहान मुलं, हृदयाच्या समस्या असलेले लोक, मूत्रपिंडाच्या समस्या असलेले लोक किंवा मग दीर्घकाळ आजारी असलेल्यांनी डिटॉक्स डाएट घेऊ नये.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)