'भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांच्याविरोधात पुरावा नाही'- पुणे ग्रामीण पोलिस

संभाजी भिडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संभाजी भिडे
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात संभाजी भिडे यांच्याविरोधात पुरावा न सापडल्याने या प्रकरणात दोषारोपपत्रातून त्यांना वगळणयात आल्याचं स्पष्टीकरण पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाला दिलं आहे.

संभाजी भिडे यांना वगळून उर्वरीत 41आरोपींविरोधात न्यायालयात 22 सप्टेंबर 2021 रोजी दोषारोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आल्याचंही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सहीने दिलेल्या पत्रकात नमूद केलेलं आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाकडे ठाण्यातून दंगल प्रकरणात संभाजी भिडेयांच्या विरोधात गुन्हाच्या तपासाबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडून सुनावणीही घेण्यात आली होती.

या लेखी स्पष्टीकरणामध्ये पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी म्हटलंय की, तपास यंत्रणेकडून गुन्ह्याच्या संभाजी भिडे यांच्या मानवी हक्कांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालेलं नाही.

याविषयी अधिक माहिती देताना संभाजी भिडे यांचे वकील अॅडव्होकेट पुष्कर दुर्गे म्हणाले की, पोलीसांनी दाखल केलेल्या दोषारपपत्रातही भिडे यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आरोपी म्हणून उल्लेख दोषारोपपत्रात नाही.

"तपासाअंती भिडे यांच्यावर दोषारोप ठेवता आला नाही, असं पोलिसांनी दोषारोपपत्रातच म्हटलंय. त्यामुळे या केसचा आणि भिडेगुरुजींचा आता तसा काही संबंध राहीलेलानाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यावर त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झालेले नाही. याप्रकरणात बाकी 41 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत," अॅड पुष्कर दुर्गे असं म्हणाले.

भीमा-कोरेगावनंतरच्या महाराष्ट्र बंददरम्यान मालमत्तेचं मोठं नुकसान झालं

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR

फोटो कॅप्शन, भीमा-कोरेगावनंतरच्या महाराष्ट्र बंददरम्यान मालमत्तेचं मोठं नुकसान झालं

संभाजी भिडे यांचा दंगल प्रकरणात किंवा कट रचण्यात सहभाग होता की नाही याचा तपास करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साक्षीदरांची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसंच यासाठीचे पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करुनही भिडेंविरोधात कोणताही ठोस पुरावा किंवा गुन्ह्यांतील प्रत्यक्ष सहभागाची पुष्टी करणारा साक्षीदार सापडला नाही, असं पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

जेव्हा ही दंगल झाली तेव्हा संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यात उपस्थित होते, असा जबाब साक्षीदारांनी पोलिसांना दिला. त्यामुळे तपासाअंती संभाजी भिडेंविरुद्ध दोषारोप ठेवता आला नाही.

या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचे नाव आरोपीच्या यादीत आहे. त्यांच्यासोबतच्या एकूण 41 जणांवर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं आहे.

भीमा कोरेगावमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर कार्यकर्त्या अनिता सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर हिंसाचार करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)