JNU : रामनवमीच्या दिवशी देशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

जेएनयू

फोटो स्रोत, CHANDAN SHARMA/BBC

    • Author, चंदन शर्मा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

देशात काही ठिकाणी रामनवमीच्या दिवशी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष झाला. जेएनयू कॅम्पसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना यांनी एकमेकांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने माहिती दिलीय की, या प्रकरणात जेएनयू विद्यार्थी संघटना, एसएफआय, डीएसएफ आणि आयसाच्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी (11 एप्रिल) सकाळी अभाविपच्या अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आयपीसी कलम 321,341, 509, 506 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अभाविपचे विद्यार्थी सोमवारी (11 एप्रिल) तक्रार दाखल करतील असंही त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती एएनआयने दिली आहे. तक्रारींच्या आधारे आवश्यक कारवाई करणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

मेसमध्ये मांसाहार जेवणावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. अभाविपने विद्यापीठाच्या कावेरी हॉस्टेलमध्ये मांसाहर जेवणाला विरोध केला असा डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे.

ऑल इंडिया स्टुंडंट्स असोसिएशनने (आईसा) ट्वीट करत दावा केला आहे की, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ज्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

रविवारी (11 एप्रिल) रामनवमी निमित्त अभाविपने कावेरी आणि पेरियार हॉस्टेल दरम्यान पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप आहे.

जेएनयूमध्ये बीबीसीचे सहयोगी पत्रकार चंदन शर्मा यांनी सांगितलं, रात्री दहा वाजेपर्यंत विद्यापीठाचे वातावरण तणावाचे होते. आता कॅम्पसमध्ये पोलिसांचाही बंदोबस्त आहे.

अभाविपने ट्वीटरवर पोस्ट केलं आहे की, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या हल्ल्यात त्यांचे कार्यकर्ते रवी राज गंभीर जखमी झाले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

जेएनयूमध्ये अभाविपशी संबंधित असलेल्या रोहित यांनी सांगितलं, डाव्या आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी ABVP कार्यकर्ते आणि सामान्य विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे."

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशी घोष यांनी ट्वीटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला. तसंच अभाविपने मेसच्या सचिवांवरही हल्ला केल्याचा आरोप आहे.

"अभाविपचे गुंड आम्हाला सांगणारे कोण आहेत की आम्ही काय खायचे आणि काय नाही?"

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

जेएनयू प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त का केला नाही? असे प्रश्न आयशी घोष यांनी उपस्थित केले आहे.

मधुरिमा नावाच्या विद्यार्थिनीने सांगितंल, रविवारी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मांसाहारी जेवण मिळतं आणि त्यांना काय खायचे आहे हे विद्यार्थी हे ठरवू शकतात.

त्या म्हणाल्या "अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमधला मटण पुरवठा रोखला आणि मेसच्या सचिवांना मारहाण केली."

मधुरिमा पुढे सांगतात, "दुपारी अभाविप आणि विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आणि मग ते संध्याकाळी आठ वाजल्यानंतर पुन्हा आले आणि विद्यार्थ्यांना मारहाण करू लागले."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

या हल्ल्यात आपल्यालाही जखम झाल्याचा दावा मधुरिमा यांनी केला आहे.

अभाविपशी संबंधित दिव्या या विद्यार्थिनीने निवेदन जारी केलं आहे. विद्यार्थी रामनवमीची पूजा करत होते आणि डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केला असं निवेदनात म्हटलं आहे.

दिव्या सांगतात, "कावेरी हॉस्टेलमध्ये आम्ही रामनवमीची पूजा करण्यासाठी गेलो होतो. माझा आज उपवास होता. अचनाक काही डाव्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या हाताला जखम झाली आहे. हा हल्ला का झाला याची मला कल्पनाही नाही."

मांसाहारावरून वाद?

रविवारी (10 एप्रिल) रामनवमी होती. हिंदू धर्मात मोठ्या संख्येने लोक यादिवशी उपवास करतात आणि मांसाहार वर्ज्य करतात. काही लोक लसूण आणि कांद्याचं सेवनही करत नाहीत.

जेएनयू

फोटो स्रोत, CHANDAN SHARMA/BBC

यावर्षी नवरात्र दरम्यान दक्षिण दिल्ली नगर निगम आणि जुनी दिल्ली नगर महापौरांनी मांसाहारवर बंदी आणल्याची घोषणा केली होती. दरम्यान, महापौरांना अशापद्धतीने खाण्यावर बंदी आणण्याचा अधिकार नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.

दिल्लीतील अनेक भागांमध्ये नऊ दिवस मांसहाराची दुकानं बंद होती.

जेएनयू विद्यापीठात यापूर्वही विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला आहे. यावेळी मांसाहार हे निमित्त ठरलं.

देशाची राजधानी दिल्ली येथे असलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ उच्च शिक्षणाचे एक उत्कृष्ट दर्जाचे केंद्र समजले जाते. या विद्यापीठात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला आहे.

देशात अनेक ठिकाणी हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये रविवारी बांकुडा या गावात रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेवर हल्ला करण्यात आला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. बांकुडा येथे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांच्या गाडीवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. हावडा येथेही शोभायात्रेवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. भाजपनं हल्ल्यांसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं भाजपचे आरोप फेटाळले आहेत.

बंगालमधील हिंसाचार

फोटो स्रोत, sanjay Das

फोटो कॅप्शन, बंगालमधील हिंसाचार

मध्य प्रदेशातल्या खरगोन इथं रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर कर्फ्यू लावण्यात आला आहे. यादरम्यान शहरातील अनेक ठिकाणांवर दगडफेक आणि आग लावण्यात आली. यात पोलिस अधिकाऱ्यांसहित अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनानं सध्या तीन पोलीस स्टेशच्या कार्यक्षेत्रात कर्फ्यू लावला आहे. तसंच पूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. रविवारी रामनवमीची शोभायात्रा निघत होती, त्याचवेळी दगडफेकीची घटना घडली आणि मग परिस्थिती चिघळली.

झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार झाला आणि वाहनांना पेटवून देण्यात आलं. यात अनेक जण जखमी झाले आहेत. यातल्या एका व्यक्तीचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इथं सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जेएनयूमध्ये आताची परिस्थिती काय?

रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत विद्यापीठात तणावपूर्ण परिस्थिती होती. कॅम्पसमध्ये आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एकाबाजूला उजव्या वितारधारेचे विद्यार्थी जमा होत होते तर दुसऱ्या बाजूला डाव्या विचारधारेचे विद्यार्थी मोर्चा काढण्याची तयारी करत होते.

पोलिस बंदोबस्त

फोटो स्रोत, ANI

हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे की रामनवमी पूजेदरम्यान डाव्या संघटनांनी घोषणाबाजी केली आणि जेएनयूचे हिंदूकरण होत असल्याचा दावा केला. रमजानच्या महिन्यात जेएनयूमध्ये इफ्तार होऊ शकते तर मग रामनवमीची पूजा का नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला."

जेएनयूचे प्रवेशद्वार काहीकाळासाठी बंद करण्यात आलं होतं. अभाविपच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, "विद्यापीठात रामाचा अपमान सहन केला जाणार नाही."

दुसऱ्या बाजूला डाव्या विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे की अभाविप जेएनयू कॅम्पसमध्ये हिंदू विचारधारा थोपण्याचा प्रयत्न करत आहेत. साबरमती हॉस्टेलबाहेर विद्यार्थी जमले आणि त्यांनी मोर्चा काढला.

गुजरातमध्येही हिंसाचाराच्या घटना?

गुजरातमध्ये साबरकांठा येथील हिंमतनगर आणि आणंद जिल्ह्यातील खंभात याठिकाणी रामनवीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. यात अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

गृहमंत्र्यांनी रात्री 11 वाजता यासंदर्भात बैठक बोलवली होती. यावेळी पोलीस महासंचालक, अहमदनगर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी आणि रॅपिड अक्शन फोर्सचे अधिकारी उपस्थित होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधाराच्या गोळ्या झाडल्या. दोन गटांत दगडफेक, टायर आणि वाहन जाळपोळ घटना आणि इतर काही हिंसक घटनांचे वृत्त आहे. पोलिसांनी काहीवेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली पण तोपर्यंत काही लोक जखमी झाले होते.

साबरकांठाचे पोलीस अधिक्षक विशाल वाघेला यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी भार्गव पारिख यांना दिली. ते म्हणाले, "रामनवमी निमित्त रामजी मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे."

आणंद जिल्ह्यातील खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांत हिंसा, जाळपोळ आणि दगडफेक झाली. बीबीसीशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, चौकशी आणि गस्त सुरू आहे, संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)