कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन 225 रुपयांना, उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस घेता येणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबतचं पत्रक काढत घोषणा केलीय.

कोव्हिडवरील लशीचा दुसरा डोस घेतल्याला 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच बूस्टर डोस घेता येणार आहे.

हा बूस्टर डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय.

आतापर्यंत 2.4 कोटी बूस्ट डोस हे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वय वर्षं असलेल्यांना देण्यात आले आहेत.

सध्या सरकारी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वय वर्षं असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

भारतातील 15 वर्षांवरील 96 टक्के व्यक्तींनी आतापर्यंत लशीचा एक डोस, तर 83 टक्के व्यक्तींनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

कोव्हिशिल्ड लशीची किंमत 600 वरून 225 रुपयांवर आणण्याचा निर्णय झाल्याचं आदर पुनावाला यांनी जाहीर केले आहे.

त्यापाठोपाठ भारत बायोटेकने तयार केलेली लस कोव्हॅक्सिनची किंमतही 225 रुपये होत असल्याची माहिती कोव्हॅक्सिनच्या सहसंस्थापिका सुचित्रा एला यांनी दिली आहे. या निर्णयामुळे लस घेणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

केंद्र सरकारसोबत चर्चा करून हे दर कमी करण्यात आल्याचं दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी म्हटलंय. त्यामुळे खासगी लसीकरण केंद्रांवर जर तुम्ही कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या पहिल्या दोन डोसेससाठी पैसे भरले असतील तर त्यापेक्षा फार कमी खर्चात तुमचा तिसरा डोस होऊ शकतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकानुसार हे खासगी लसीकरण केंद्र जास्तीत जास्त 150 रुपय सेवाशुल्क म्हणून आकारू शकतात.

तुम्ही एक तर थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकता किंवा कोविन ॲपवर नोंदणी करून जाऊ शकता. पण प्रत्येक लसीकरणाची नोंद कोविन ॲपवर होणं गरजेचं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)