कोरोना: राजेश टोपे म्हणतात, महाराष्ट्रात मास्क सक्तीचा तूर्तास विचार नाही

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC
'महाराष्ट्रात तूर्तास मास्क सक्ती नाही. मात्र र्दीच्या ठिकाणी मास्क वापरा', असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
एकच दिवस आधी राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं स्पष्ट केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा काल (27 एप्रिल रोजी) घेतला. यावेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आणि कोरोना टेस्टिंगबाबत चर्चा झाल्याचं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात दररोज जवळपास 25 हजार जणांचं टेस्टिंग होत आहे. कोरोना केसेस वाढत असल्याने टेस्टिंग वाढवलं जाणार आहे.
बैठकीत काय चर्चा झाली?
- 6-12 वयोगटासाठी लसीकरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
- 12-15 वयोगटाच्या लसीकरणाकडे लक्ष देण्याची गरज असून यासाठी पालक आणि शिक्षकांना विश्वासात घेऊन मोहीम सुरू केली जाणार आहे.
- राज्यात कोरोनाचे नवीन व्हेरियंट आढळले असले तरी ते ओमिक्रॉनचाच भाग असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसच्या XE व्हेरियंटचा एक रुग्ण मुंबईत आढळल्याचं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं. यासोबतच मुंबईमध्ये 'कपा' व्हेरियंटचाही एक रुग्ण आढळल्याची माहिती होती.
मुंबईमध्ये कोरोनाच्या 'एक्सई' आणि 'कपा' व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याचं वृत्त होतं.
मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अजून हे रुग्ण 'XE' आणि 'कपा' व्हेरिएंटचे असल्याचं अजून स्पष्ट झालं नसल्याचं म्हटलंय.
"NIV आणि कस्तुरबा गांधी लॅबकडून अजून कोणतंही कन्फर्मेशन नाहीये. कन्फर्मेशन झाल्यानंतर यासंदर्भातल्या सूचना आम्ही तुम्हाला पाठवू," असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (7 एप्रिल) माध्यमांशी बोलताना म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, ज्या व्यक्तिला नवीन व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय होता, तो पूर्ण बरा झाला आहे. तसंच त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आलीये. संबंधित व्यक्तीचे सँपल विषाणूच्या स्ट्रेनचा प्रकार कन्फर्म करण्यासाठी NIBMGकडे पाठवले आहेत. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. लोकांनी घाबरून जाऊ नये, अशी मी विनंती करतो," असं ट्वीट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीएमसीनं विदेशातून प्रवास करून आलेल्या काही लोकांचं रँडम सँपलिंग केलं त्यात या तरुणीचंसुद्धा सँपल घेण्यात आलं होतं. त्यात ही तरूणी पॉझिटिव्ह आढळून आली होती.
तिला लागण झालेल्या व्हेरिएंटचं जिनोम सिक्वेसिंग केल्यानंतर तो XE व्हेरिएंट असल्याचं समोर आलं आहे.
यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे शशांक जोशी यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.
हे प्रकरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातलं आहे. बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरा आहे, त्याचा जिनोम सिक्वेंसिंगचा डेटा मात्र आता आल्यामुळे हे समोर आले आहे, असं जोशी यांनी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मुंबईतल्या 230 रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास-जीनोम सिक्वेंन्सिंग करण्यात आलं. यापैकी 228 सँपल्समध्ये या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग असल्याचं आढळलं. कोरोनाच्या XE आणि कप्पा व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
या 230 रुग्णांपैकी 21 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. लशीचा पहिला डोस घेतलेल्या कुणालाही रुग्णालयात दाखल करावं लागलं नाही. तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी 9 जण रुग्णालयात दाखल झाले होते. लशीचा एकही डोस न घेतलेल्या 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 21 जणांपैकी कुणालाही ऑक्सिजन वा ICU ची गरज लागली नसल्याचं मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








