KGF-2 Trailer: पुष्पा, RRR नंतर आता KGF-2 बॉक्स ऑफिसवर जादू करण्यासाठी तयार

फोटो स्रोत, Twitter
'मला हिंसा आवडत नाही, पण हिंसेलाच मी आवडतो,' असं म्हणत यश रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
बहुचर्चित केजीएफ-2 चित्रपटाचा ट्रेलर धूमधडाक्यात लाँच करण्यात आला. गेल्या वर्षी केजीएफ2 चाहत्यांच्या भेटीला येणार होता. पण कोरोना संकटामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बंगळुरूत झालेल्या कार्यक्रमात हा ट्रेलर चाहत्यांसाठी खुला झाला. ट्रेलर लाँचसाठी म्हणून दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन मुंबईहून बंगळुरूला आले होते. तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रशांत नील यांच्या नेतृत्वात हा चित्रपट तयार झाला आहे. रॉकी भाईचा सत्तेपर्यंतचा प्रवास यात उलगडणार आहे. रॉकी भाईच्या विरोधात अधिरा दिसणार आहे. संजय दत्तने अधिराची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्त कन्नड चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहेत. दोन दशकांनंतर रवीना टंडनचं कन्नड चित्रपटांमध्ये पुनरागमन झालं आहे.

फोटो स्रोत, Twitter
या दोघांच्या बरोबरीने प्रमुख कलाकार यश, दिग्दर्शक प्रशांत नील, निर्माता विजय किरागांदूर यांच्यासह चित्रपटाशी संबंधित अनेक मंडळी उपस्थित होती.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांनी मल्याळम आवृत्तीचे अधिकार मिळवले आहेत.
उत्तम कथानक, दमदार अभिनयकौशल्य आणि चित्रीकरण यांच्या जोरावर 'केजीएफ'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

फोटो स्रोत, Twiter
रॉकीची आई आणि त्याचं बालपण दाखवण्यात आलं आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला. तसंच त्याने दिलेलं वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
या टिझरमध्ये अभिनेत्री रवीना टंडन झळकली असून या चित्रपटात ती राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं दिसून येत आहे. तसंच संजय दत्तचीदेखील झलक या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच सुपरस्टार यशदेखील त्याच्या दमदार स्टाइलमध्ये झळकला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








