शिबानी दांडेकर : फरहान अख्तरच्या 'मराठी' बायकोबद्दल या गोष्टी माहिती आहेत?

फरहान अख्तर- शिबानी दांडेकर

फोटो स्रोत, Instagram/Shibani Dandekar

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाह केला.

या विवाह सोहळ्याला दोघांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील मोजक्या सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. हा अत्यंत खाजगी कार्यक्रम होता. माध्यमांना या कार्यक्रमापासून दूरच ठेवण्यात आलं होतं.

लग्नानंतर तीन दिवसांनी फरहाननं एक पोस्ट लिहीत सर्वांचे आभार मानले आहेत.

"काही दिवसांपूर्वी मी आणि शिबानी दांडेकर एकत्र आलो, आम्ही आमचं सोबत येणं सेलिब्रेट केलं. त्यादिवशी आमच्या खाजगीपणाचा आदर राखल्याबद्दल सर्वांचे आभार. अर्थात, तुमच्यासोबत आमचे खास क्षण शेअर केल्याशिवाय हे सेलिब्रेशन अपूर्ण आहे," असं म्हणत अभिनेता फरहान अख्तरनं त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर 19 फेब्रुवारी रोजी दोघं विवाह बंधनात अडकले.

फरहान अख्तर- शिबानी दांडेकर

फोटो स्रोत, Instagram/Shibani Dandekar

विशेष म्हणजे दोघांनी हिंदु किंवा मुस्लीम पद्धतीनं विवाह न करता Vow म्हजे लग्नाची वचनं घेत आणि रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.

कशी सुरू झाली लव्ह स्टोरी?

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची लव्ह स्टोरी एका रिअॅलिटी शोदरम्यान सुरू झाली होती, असं अनेक माध्यमांच्या रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

2015 मध्ये 'आय कॅन डू दॅट' नावाच्या रिअॅलिटी शोच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यावेळी फरहान अख्तर विवाहित होता आणि तो शोचा होस्ट होता.

शिबानी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री वाढली होती. हळूहळू ते दोघं एकमेकांच्या जवळ येत गेले.

फरहान अख्तरच्या विवाहाला हृतिक रोशन, फरहा खान यांचीही उपस्थिती होती.

फोटो स्रोत, Instagram/Shibani Dandekar

फोटो कॅप्शन, फरहान अख्तरच्या विवाहाला हृतिक रोशन, फरहा खान यांचीही उपस्थिती होती.

2018 पासून फरहान अख्तर आणि शिबानी यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर आता ते एकमेकांशी विवाह बंधनात अडकत आहेत.

फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भवानी यांचा 16 वर्षाच्या वैवाहिक संसारानंतर 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.

कोण आहे शिबानी दांडेकर?

शिबानी दांडेकर मॉडेल, अभिनेत्री आहे. पुण्यातील एका मराठी कुटुंबामध्ये शिबानीचा जन्म झाला आहे. तिला अनुषा आणि अपेक्षा नावाच्या दोन बहिणी आहेत.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर

जन्म पुण्याचा असला तरी शिबानी लहानाची मोठी झाली ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत.

शिबानीची बहीण अनुषा हीदेखील सिनेइंड्स्ट्रीशी संलग्न आहे. अनुषा गायिका आणि अभिनेत्री असून अभिनेता करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळं तसंच नंतर ब्रेकअपमुळं ती चर्चेत आली होती.

शिबानीनं भारताबरोबरच अमेरिकेमध्येही काही शो केले आहेत. अमेरिकेच्या नमस्ते इंडिया, एशियन व्हरायटी शो आणि व्ही देसी सारख्या शोमध्ये ती सहभागी झाली होती.

झलक दिखला जा, खतरो के खिलाडी सारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.

चित्रपटांबरोबरच आयपीएलशीही नातं

चित्रपट आणि ग्लॅमर इंडस्ट्रीबरोबरच शिबानी हिचं क्रिकेटबरोबरही खास नातं राहिलेलं आहे. आयपीएल स्पर्धेत शिबानीनं होस्ट म्हणून कामगिरी बजावली आहे.

शिबानी दांडेकर

फोटो स्रोत, Instagram

2011 ते 2015 या काळात शिबानीनं इंडियन प्रिमियर लीगमध्ये होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

काही चित्रपटांमध्येही शिबानीनं भूमिका केल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं रॉय आणि सलमान खानच्या सुलतान अशा चित्रपटांचा समावेश आहे.

नाम शबाना, नूर आणि भावेश जोशी सारख्या चित्रपटांतही तिनं अभिनय केला आहे.

वयातील फरकामुळं ट्रोल?

फरहान अख्तर आणि शिबानी यांच्या वयामध्ये 7 वर्षांचा फरक आहे. या मुद्द्यावरून तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

2018 मध्ये शिबानी हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. त्यामुळंही तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्यानंतरही तिच्या विरोधात सोशल मीडियावरून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)