You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ISWOTY : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी यंदा ज्युरी कोण?
8 फेब्रुवारी: प्रतीक्षा आता संपली. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्काराच्या तिसऱ्या अध्यायासाठी नामांकनं जाहीर झाली असून आजपासून मतदानालाही सुरूवात झाली आहे.
नावाजलेले क्रीडापत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश असलेल्या ज्युरींनी निश्चित केल्यानुसार BBC ISWOTY साठी पाच खेळाडूंना नामांकन मिळालं आहे :
- अदिती अशोक, गोल्फपटू
- अवनी लेखरा, पॅरा-नेमबाज
- लवलिना बोरगोहाईं, बॉक्सर
- पी. व्ही. सिंधू, बॅडमिंटनपटू
- सायखोम मिराबाई चानू, वेटलिफ्टर
ऑनलाईन मतदान भारतीय वेळेनुसार 28 फेब्रुवारीला रात्री 11.30 (1800 GMT) वाजेपर्यंत सुरू राहील आणि विजेत्यांचं नाव 28 मार्च 2022 रोजी दिल्लीत एका पुरस्कार सोहळ्यात जाहीर केलं जाईल.