मद्य विक्री : महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन, मात्र ही असेल अट

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रात अनेक वायनरीज आहेत. त्यामुळे किराणा सामान मिळणाऱ्या सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन विकण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली आहे."
"1000 चौरस फूटच्या जागेत शोकेस करून वाईन विकता येईल. शेतकर्यांच्या फलउत्पादनाला यामुळे चालना मिळेल, असं मलिक यांनी म्हटलं.
"भाजपची सत्ता असणार्या अनेक ठिकाणी त्यांनी हे धोरण स्वीकारले आहे. हिमाचल आणि गोव्यामध्ये भाजपने हे धोरण स्वीकारलेलं आहे," असंही मलिक यावेळी म्हणाले.
डिसेंबरपासून सुरू होती चर्चा
नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती आता दिली असली तरी याबाबत डिसेंबर महिन्यापासून चर्चा सुरू होती. त्यावेळी विविध माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या छापून आल्या होत्या.
वाईनचा उपयोग बाजारात अनेक बेकरी उत्पादनांमध्ये केला जात असतो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे दैनंदिन किराणाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानातही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात होता.
अनेक ठिकाणी वाईन ही चवीसाठी वापरली जाते. यामुळे बिअरच्या धर्तीवर वाईनचीही विक्री किराणा दुकानात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दरम्यान, दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडेल, असा अंदाज आहे.
सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीसांची टीका
किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असं फडणवीस ट्विट करून म्हणाले आहेत.
दरम्यान, दारूबंदी आंदोलनातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला.
ते म्हणाले, "व्यसनमुक्तीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या अनिल अवचट यांच्या मृत्यूच्या दिवशीच सुपर मार्केटमध्ये दारूविक्रीचा निर्णय घेणे हे अतिशय असंवेदनशील व संतापजनक आहे. 2011 साली महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरणात व्यसनाचा पुरवठा दिवसेंदिवस कमी कमी करत जाण्याचे धोरण स्वीकारले आहे.
"असं असूनही दारूबंदी उठवणे, दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे हे आपल्याच धोरणाशी विसंगत आहे. यातून तरुण मुले अधिक व्यसनी होणार आहेत, त्यामुळे हे धोरण रद्द करावे," अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








