त्रिपुरात नेमकं काय घडलं होतं ज्याचे पडसाद अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये उमटले?

अमरावती हिंसाचार

फोटो स्रोत, BBC/nitesh raut

अमरावती शहरात सध्या संचारबंदी लागू आहे. पडसादांवर उमटणारे पडसाद, निषेध आणि आरोप-प्रत्यारोपांच्या घटनाक्रमात अमरावती शहरातलं वातावरण गेल्या तीन-चार दिवसांपासून गढूळ बनल्याचं दिसत आहे.

शुक्रवारी (12 नोव्हेंबर) रझा अकादमी या संघटनेकडून अमरावतीत तोडफोडीचा प्रकार घडल्याचं समोर आलं. तो प्रकार शमतो न शमतो त्याच्या निषेधार्थ शहरात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन करण्यात आलं.

बंद पुकारलेल्या दिवशीही (शनिवार, 13 नोव्हेंबर) अमरावतीत गोंधळाचं वातावरण होतं. यादरम्यान काही ठिकाणी पळापळी, तोडफोडीचं दृश्यही समोर आलं.

त्यानंतर जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात चार दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात येणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या प्रकाराची दखल शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयानेही घेतली. त्रिपुरामध्ये मशिदीचं नुकसान केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असून याबाबत अफवा पसरवू नये, नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, शांतता बाळगावी, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर अमरावती आणि परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीमध्ये या घडामोडी घडताना दिसत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, याची सविस्तर माहिती आपण या बातमीत घेऊ.

त्रिपुरा प्रकरण काय आहे?

या संपूर्ण प्रकाराचं मूळ खरंतर बांगलादेशात आहे. पण भारतात याचे पडसाद उमटण्याची सुरुवात त्रिपुरामधून झाली आहे.

देशाच्या ईशान्येला असलेल्या त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकाराची प्रतिक्रिया म्हणून याकडं पाहिलं जात आहे.

मुस्लीम नागरीक

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशात नवरात्रीच्या काळात नवरात्रोत्सव मंडप आणि मंदिर परिसरात काही समाजकंटकांकडून हल्ल्याचे प्रकार झाले.

त्रिपुरा हे राज्य बांगलादेशाला अगदी लागून असल्यामुळं याठिकाणी हा तणाव पसरल्याचं सांगितलं जात आहे.

त्रिपुरात विश्व हिंदू परिषद आणि जमात-ए-उलेमा (हिंद) अशा धार्मिक संघटना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. याठिकाणी विविध गटांकडून एकमेकांच्या विरोधात हिंसाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या हिंसाचारामध्ये अनेक खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करत असल्यानं, त्यावरूनही रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी खोटे फोटो, व्हीडिओ किंवा आक्षेपार्ह माहिती पसरवून त्या माध्यमातून धार्मिक तणाव वाढण्याचा धोका असल्यानं, कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

तर यूएपीएच्या माध्यमातून ठरावीक गटाला लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा आरोप, याला विरोध करणाऱ्यांनी केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं काय?

बीबीसी हिंदीने नुकतीच यासंदर्भात पिनाकी दास यांची एक बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनुसार, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते पूर्णाचंद्रा मंडल यांच्या मते, बांग्लादेशातील घटनेच्या विरोधात त्रिपुरा येथील 51 ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं होतं.

पण या आंदोलनकर्त्यांवर मुस्लीम समाजातील लोकांनी दगडफेक केली. अशोक कुमार नामक एका व्यक्तीला त्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं.

याप्रकरणी त्रिपुरामधील पानीसागर पोलीस ठाण्यात अशोक कुमार यांच्या पत्नीने तक्रारही दाखल केली आहे, असा दावा मंडल यांनी केला होता.

'घाबरलेले मुस्लीम नागरीक'

स्थानिक मुस्लीम समाजावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे इथल्या मुस्लीम बांधवांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जातो.

2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला होता. कम्युनिस्ट पक्ष याठिकाणी 25 वर्षं सत्तेत होता.

मुस्लीम नागरीक

फोटो स्रोत, Getty Images

घटनेच्या चार दिवसांपूर्वी जमात-ए-उलेमा (हिंद) या त्रिपुरातल्या मुस्लीम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या वरीष्ठांनी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांची भेट घेतली होती.

राज्यात असं काही घडू शकतं, असा इशारा त्यांनी दिला होता.

या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य इमाम अब्दुल रहमान यांच्या मते, पोलीस आणि प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने हाताळलं असतं तर अशा घटना रोखता येऊ शकल्या असत्या.

अब्दुल रहमान हे आगरतळा येथील जामा मशिदीत इमाम पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मते, राजेशाही असल्यापासून त्रिपुरामध्ये कधीच धार्मिक हिंसाचार घडला नव्हता. पण पहिल्यांदा 2019 मध्ये बैदीदीगीहमध्ये एका जमावाने मशिदी आणि मुस्लीम नागरिकांवर हल्ला केला होता. आता हे राज्यात सर्वत्रच होत आहे.

त्रिपुराच्या राजघराण्याचे प्रमुख प्रियदत्त किशोर देबबर्मन सांगतात, राज्यात हिंदू-मुस्लीम विभाजन हा अलीकडचाच प्रकार आहे. यामधून राजकीय फायदा मिळवण्यासाठी असं केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

देब बर्मन हे त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. पण CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन नवा पक्ष स्थापन केला होता.

त्यांच्या मते, "इथलं धार्मिक ध्रुवीकरण राजकारणाने प्रेरित आहे. सत्ताधारी पक्ष आपलं अपयश झाकण्यासाठी बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे."

काँग्रेसकडून आरोप

त्रिपुरात काँग्रेस पक्षाकडून हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकाराकडे सर्वांचं लक्ष वेधताना एक ट्वीट केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते म्हणाले, "आमच्या मुस्लीम बांधवांविरोधात त्रिपुरात हिंसाचार सुरू आहे. हिंदू होण्याच्या नावाने हिंसा आणि द्वेष पसरवणारे लोक हिंदू नसून ढोंगी आहेत. सरकार कधीपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करेल?"

भाजपचं स्पष्टीकरण

यादरम्यान भाजप नेत्यांच्या एका पथकाने त्रिपुरात हिंसाचार घडलेल्या ठिकाणांना भेट दिली होती. त्यामध्ये खासदार रेबाती त्रिपुरा आणि आमदार बिनय भूषण यांचाही समावेश होता.

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब

येथील रहिवासींसोबत या पथकाने चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपत्तीच्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाईचीही घोषणा केली आहे.

या प्रकरणात 30 ऑक्टोबरपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

यासंदर्भात बोलताना आमदार बिनय भूषण म्हणाले, काही समाजकंटक रॅलीमध्ये किंवा बाहेरून आलेले असू शकतात. त्यांनी विरोधी पक्षाच्या पाठिंब्याने हिंसाचार पसरवलेला असू शकतो. पोलीस तपासातून सगळी माहिती समोर येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

भाजप खासदार विनोद सोनकर यांनी या हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाला जबाबदार ठरवलं. पण त्रिपुराच्या तृणमूल काँग्रेस प्रमुख सुष्मिता देव यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रत्यारोप केल्याचं दिसून आलं.

'मशिदीच्या नुकसानीची बातमी चुकीची'

दरम्यान, पोलिसांनी राज्यात कठोर बंदोबस्त केल्याची माहिती दिली.

पानीसागर परिसरात मशिद जाळण्यात आल्याची एक बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. पण ही बातमी चुकीची आहे, असं स्पष्टीकरण त्रिपुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भानुपाडा चक्रवर्ती यांनी दिलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अमरावतीमध्येही प्रामुख्याने याच मशिद प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनांना हिंसक वळण प्राप्त होऊन येथील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, अमरावतीत हा घटनाक्रम सुरू असतानाच शनिवारी केंद्र सरकारकडूनही या प्रकरणी एक स्पष्टीकरण आलं.

त्रिपुरामध्ये मशिदीचं नुकसान केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असून याबाबत अफवा पसरवू नये, नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, शांतता बाळगावी, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.

अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. त्रिपुरात कोणत्याही मशिदीचं नुकसान करण्यात आलेलं नाही. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांप्रमाणे कोणाचाही मृत्यू, लैंगिक हिंसाचार किंवा कुणी जखमी झाल्याचीही नोंद नाही, असं गृह मंत्रालयाने सांगितलं.

सामाजिक शांतता आणि एकतेला लक्ष्य करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहे. चुकीच्या बातम्यांच्या आधारे महाराष्ट्रात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत. नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)