अनन्या पांडेची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आज पुन्हा चौकशी

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.

गुरुवारी (21 ऑक्टोबर) दुपारीही अनन्याची जवळपास 2 तास चौकशी करण्यात आली होती.

त्यापूर्वी अनन्या पांडेच्या घरी जाऊन NCB ने तिला समन्स बजावलं होतं.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंध समोर आल्यानंतर हे समन्स बजावण्यात आले होते.

त्यानुसार अनन्या पांडेला चौकशीसाठी दुपारी 2 वाजता NCB कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्यासंबंधीची नोटीस तिच्या हाती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सध्या अटकेत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅप वर काही चॅट आढळून आल्यानंतर NCB ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

आज NCB चं पथक शाहरुख खानच्या मन्नत या घरीही गेलं होतं.

अनन्या पांडे ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. 2019 साली 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून अनन्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर 'पती, पत्नी और वो', 2020 मध्ये प्रदर्शित झालेला 'खाली पीली' या सिनेमांमध्ये ती झळकली. तर आगामी वर्षभरात अनन्याचे आणखी 3 सिनेमे येऊ शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)