पंकजा मुंडे : 'दोन वर्षांमध्ये खूप गोष्टी मनामध्ये साठल्या, त्या तुम्हाला सांगायच्या आहेत'

भाजप नेत्या पंकजा मुंडे या 15 ऑक्टोबर म्हणजेच उद्या शुक्रवारी सावरगावमध्ये दसरा मेळावा घेणार आहेत.

"मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. दोन वर्षांमधल्या खूप गोष्टी मनामध्ये साठलेल्या आहेत. तुमचंही ऐकायचंय, मलाही बोलायचं आहे," असं म्हणत त्यांनी या मेळाव्याविषयी फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

काय म्हटलंय व्हीडिओत?

पंकजा मुंडे यांनी या व्हीडिओत पुढील मुद्दे मांडले आहेत.

  • 15 ऑक्टोबर रोजी भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव येथे आपण सर्व भगवान भक्ती गडावर आपल्या भक्ती आणि शक्तीची परंपरा जपण्यासाठी येणार आहात.
  • सगळ्यांनी 11 ते 11.30च्या दरम्यान सभेच्या ठिकाणी येऊन थांबावं. घरातून निघताना आपापली शिदोरी बांधून घ्यावी, गाडीत भरपूर पाणी असू द्यावं.
  • गाडी पार्क करताना इतर गाड्यांची वाहतूक होऊ शकेल, याची काळजी घ्या.
  • प्रीतम मुंडे यांची गोपीनाथ गडावर जी रॅली निघणार आहे, त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी घ्या.
  • कोरोनाचं संकट जरी टळलं असेल तरीही आपण सर्वांनी खूप काळजी घ्यायची आहे. मास्क, सॅनिटायझर घेऊन यायचं आहे.
  • मागच्या वर्षी पहिल्यांदा आपला मेळावा प्रत्यक्ष रुपात झाला नाही. तो ऑनलाईनच्या रुपात झाला. त्यामुळे मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. दोन वर्षांमधल्या खूप गोष्टी मनामध्ये साठलेल्या आहेत. तुमचंही ऐकायचंय, मलाही बोलायचं आहे.
  • या दोन वर्षांमध्ये अनेक घटना घडल्या, अनेक उतार-चढाव आपण पाहिले. या दोन वर्षांमधले अनेक संघर्ष, यश-अपयश याची सर्व कहाणी आणि तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा, या सगळ्यांची आखणी हा असेल माझ्या भाषणाचा सूर.
  • मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मी जे बोलते ते स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंस्फूर्तीनं बोलते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)