यूपी सरकारच्या विकासाच्या जाहिरातीत कोलकात्यातली चित्रं, सोशल मीडियावर ट्रोलिंग

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रात आज (12 सप्टेंबर) उत्तर प्रदेश सरकारच्या विकासाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. मात्र, ही जाहिरात सोशल मीडियावर ट्रोलिंगचं कारण बनलीय.

'ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ' (योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये बदलतं उत्तर प्रदेश) या मथळ्याची ही जाहिरात 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या पूर्ण पानभर छापण्यात आलीय.

या जाहिरातीत गगनचुंबी इमारती, फ्लायओव्हर आणि चकचकीत रस्ते अशा गोष्टी दाखवण्यात आले आहेत. या जाहिरातीत लिहिलंय की, "2017 च्या आधी गुंतवणुकीबाबत बाहेरील लोक उत्तर प्रदेशवर हसत असत. मात्र, गेल्या साडेचार वर्षात आम्ही उत्तर प्रदेशच्या या नकारात्मक प्रतिमेला बदललं."

मात्र, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही फॅक्ट चेकर्सनी त्यातील एका गोष्टीकडे लक्ष वेधलं की, जाहिरातीत छापण्यात आलेल्या इमारती आणि फ्लायओव्हर उत्तर प्रदेशातील नाहीत, तर पश्चिम बंगालमधील आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

विशेष म्हणजे, या जाहिरातीत कोलाकात्यात चालणाऱ्या काळी-पिळी टॅक्सीही दाखवण्यात आली आहे.

या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ हे सोशल मीडियावर टीकेचं लक्ष्य बनले.

लोकांनी प्रश्न विचारले की, "उत्तर प्रदेशचा विकास दाखवण्यासाठी भाजप सरकारकडे स्वत:च्या कामाचा फोटो नाहीय का?"

राजकीय नेत्यांकडून टीकास्त्र

या जाहिरातीची सोशल मीडियावरून खिल्ली उडवली गेलीच, त्याचसोबत राजकीय वर्तुळातूनही टीका झाली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, "योगींच्या उत्तर प्रदेशातील जाहिरातीत कोलकात्यातील एमएए फ्लायओव्हर आहे. आमचं जे डब्ल्यू मॅरियट आणि प्रसिद्ध काळी-पिळी टॅक्सीही आहे. आता तुमची नियत बदला किंवा जाहिरात एजन्सी तरी!"

मोईत्रा यांनीही असंही म्हटलं की, आता मी नोएडात माझ्याविरोधात तक्रार होईल, याची वाट पाहतेय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

तृणमूल काँग्रेसचेच खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकार वीर सांघवी यांच्या ट्वीटला रिट्विट केलं. त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "म्हणजे योगीजी पूर्ण यूपीला पश्चिम बंगाल बनवतील? का नाही? चांगली कल्पना आहे."

'द इंडियन एक्स्प्रेस'चा माफीनामा

सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून यूपी सरकारच्या या जाहिरातीवर टीका सुरू झाल्यानंतर 'द इंडियन एक्स्प्रेस'नं माफी मागणारं ट्वीट केलंय.

या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "वृत्तपत्राने उत्तर प्रदेशची जाहिरात बनवली होती, त्यात चुकून हे फोटो छापले गेले. आम्हाला या चुकीचं दु:ख आहे आणि हे फोटो वृत्तपत्राच्या सर्व ऑनलाईन आवृत्त्यांमधून हटवण्यात आलेत."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

आता सोशल मीडियावर पुन्हा प्रश्न विचारला जातोय की, या सर्व गोष्टींसाठी 'द इंडियन एक्स्प्रेस' का माफी मागतंय?

काही लोकांनी असंही विचारलंय की, 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या मार्केटिंग विभागानं हे फोटो निवडले होते का? आणि जर उत्तर होकारार्थी असेल तर सरकारच्या मंजुरीविना छापलं का?

दरम्यान, या प्रकरणाला पूर्णविराम मिळताना दिसत नाहीय. सोशल मीडियावर बरीच चर्चा अजूनही सुरूच आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)