उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकरांचा दापोलीतला बंगला पाडण्यास सुरुवात

मिलिंद नार्वेकर

फोटो स्रोत, Twitter/@NarvekarMilind_

    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी, रत्नागिरीहून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा रत्नागिरीतला बांगला पाडण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावर नार्वेकरांचा बंगला आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:च बंगल्याचं पाडकाम केल्याचं सांगण्यात येत आहे.

बीबीसी मराठीसाठी पत्रकार मुश्ताक खान यांनी घटनास्थळी जाऊन पाडकाम करणाऱ्या कामगारांशी बातचित केली असता, त्यांनी सांगितलं की, बंगला पूर्णत: पाडण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याचा अंदाज आहे.

या पाडकामावेळी प्रशासनाचे कुठलेच अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे हे पाडकाम मिलिंद नार्वेकरांकडूनच करण्यात येत असल्याची चर्चा आहे. स्वत: मिलिंद नार्वेकरांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय.

मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Mushtaq Khan/BBC

मिलिंद नार्वेकर यांच्या या बंगल्याचं पाडकाम सुरू असल्याचा व्हीडिओ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "करून दाखविले !!!! मिलींद नार्वेकरचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा. उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार."

किरीट सोमय्या उद्या (23 ऑगस्ट) स्वत: दापोलीत जाऊन बंगल्याच्या पाडकामाची पाहणी करणार आहेत.

मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3 मध्ये येत असूनही त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या.

मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Mushtaq Khan/BBC

शिवसेनेची सत्ता असल्याने स्थानिक प्रशासन कारवाई करत नसल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

लोकायुक्त आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे याप्रकरणी सुनावणी सुद्धा सुरू होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिलिंद नार्वेकर 10 ते 15 कोटींचा बंगला बांधत होते असं सोमय्या म्हणाले होते.

"लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर डावा हात मिलिंद नार्वेकर बंगला बांधत होते," असा आरोप सोमय्यांनी केला होता. तसंच मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडं तोडून बंगला उभारायचं काम सुरू केल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची याबाबत प्रतिक्रिया आल्यानंतर इथे अपडेट करण्यात येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)