शरद पवारांचा भगतसिंग कोश्यारींना टोला, 'उतारवयामुळे त्यांना आठवत नसेल'

फोटो स्रोत, Getty Images
विधानपरिषदेच्या 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 आमदारांबाबत अनेकदा पत्र दिलंय. मात्र उतारवयामुळे त्यांना आठवत नसेल," असं शरद पवार राज्यपाल कोश्यारींना उद्देशून म्हणाले.
पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीविषयी राज्यपालांना विचारलं होतं.
रणपिसेंच्या वक्तव्याला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर बसलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवत म्हणाले, "हे माझे मित्र आहेत. सरकार यासंदर्भात आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता?"
याच अनुषंगाने शरद पवार यांना आज (16 ऑगस्ट) पत्रकारांनी विचारलं असता, पवार म्हणाले, "मी राज्यपालांचं विधान वाचलं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकवेळा त्यांना पत्र दिलंय. कदाचित उतारवयामुळे त्यांना (राज्यपालांना) आठवत नसेल. शहाण्यांना शब्दाचा मार, पण शहाण्यांना."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यावरून पुन्हा एकदा आता राजकीय वर्तुळात टीका आणि प्रतिटीका पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या आघाडीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "याबाबत चर्चा होत असतात. पण अजून काही सांगण्यासारखं नाही. ममता बॅनर्जी यांचा भेटण्यासाठी फोन आला होता. पण मला मुंबईत यायचं असल्यानं भेट होऊ शकली नाही."
जातनिहाय जनगणनेची आवश्यकता - शरद पवार
शरद पवार यांनी आज (16 ऑगस्ट) घेतलेल्या या पत्रकार परिषदेत प्रामुख्यानं ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं भाष्य केलं.
"ओबीसी यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, अशी भूमिका केंद्रानं संसदेत मांडली. पण याचा काही उपयोग होणार नाही. कारण अनेक राज्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, आसाम, केरळमध्ये जास्त आरक्षण आहे. महाराष्ट्राची फसगत केंद्रानं केलीय," असं म्हणत पवार पुढे म्हणाले की, या फसवणुकीबाबत आम्ही ज्यांची फसवणूक झालीय त्यांना एकत्रित करणार आहेत.

फोटो स्रोत, NCP
"कुठलंही आरक्षण द्या. अट 50 टक्के आहे. त्यामुळे मराठा समाजाला काहीच मिळणार नाही," असं पवार म्हणाले.
महत्त्वाचं म्हणजे, शरद पवार यांनी यावेळी जातनिहाय जनगणनेची मागणी केली.
"जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. कारण तोपर्यंत लहान जातींच्या लोकांना किती प्रतिनिधित्व द्यावं हे कळणार नाही," असं पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टानं मागितलेल्या इम्पिरिकल डेटाबाबतही पवारांनी भाष्य केलं.
"यूपीएच्या काळात इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मोदी सरकारच्या काळात पुढे काही झालं नाही. अनुप्रिया पटेल यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी केलीय. केंद्रात मोदींच्या विरोधात बोलण्याचं धाडस दाखवू लागलेत," असं पवार म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








