दीपा शर्मा: KBC मध्ये 'लखपती' बनलेल्या डॉ. दीपाचा हिमाचलमधील दरड दुर्घटनेत मृत्यू

फोटो स्रोत, Twitter/@deepadoc
हिमाचल प्रदेशात दरड कोसळल्यानं नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डॉ. दीपा शर्मा या आयुर्वेदिक डॉक्टरचाही समावेश आहे.
दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच डॉ. दीपा शर्मा यांनी ट्वीट केलं होतं. हे ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
किन्नौरमधील सांगला चितकुल मार्गावरील बतसेरीजवळ दरड कोसळण्याची दुर्घटना घडली.
डॉ. दीपा शर्मा या सोशल मीडियावर सक्रिय असत. ट्विटरवर त्यांचे 20 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पेशानं डॉक्टर असलेल्या डॉ. दीपा शर्मा यांनी 2013 साली 'कौन बनेगा करोडपती' या स्पर्धात्मक कार्यक्रमातही भाग घेतला होता आणि 6.40 लाखांचं बक्षीसही जिंकलं होतं.
हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या डॉ. दीपा शर्मा या तेथील फोटो, प्रसंग ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत होत्या. त्यातले शेवटचे दोन ट्वीट आता चर्चेचे विषय ठरलेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"निसर्गाशिवाय आयुष्य काहीच नाही," असं म्हणत डॉ. दीपा शर्मा यांनी त्यांचे दोन फोटो ट्वीट केले होते. त्यात त्या पर्यटनाचा आनंद घेताना दिसत होत्या.
अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी डॉ. दीपा शर्मा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "नागरिक जाऊ शकतात अशा शेवटच्या ठिकाणी उभी आहे."
या ट्वीटनंतर काही मिनिटातच दरड कोसळली होती. या दुर्घटनेत डॉ. दीपा शर्मा यांचा मृत्यू झाला, भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
भारतीय वनसेवेतील अधिकारी परवीन कासवान हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनीही दीपा शर्मा यांना आदरांजली वाहिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यावेळी परवीन कासवान म्हणाले, "खूपच दुर्दैवी. त्या सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर बोलायच्या, चर्चा करायच्या. हिमाचलमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पत्रकार आदित्य राज कौल यांनी डॉ. दीपा शर्मा यांचे 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातील फोटो शेअर करत म्हटलंय की, डॉ. दीपा या कुणालाही मदत करण्यासाठी कायम पुढाकार घ्यायच्या.
दीपा यांचे भाऊ महेश शर्मा यांनी इंडिया टुडेला म्हटलं आहे की "हिमाचल प्रदेशला जाण्यापूर्वी माझं आणि दीपाचं बोलणं झालं होतं. मी काळजी देखील व्यक्त केली होती. हिमाचलमध्ये भूस्खलन होत असल्याचं तिला म्हटलं होतं पण दीपा म्हणाली या स्वतंत्र घटना आहेत. पण आता दीपा गेली. आमच्या जवळ आता काय उरलं आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)