मोहन भागवत : संघटना महत्त्वाची, बाकी सरकार वगैरे पूरक गोष्टी, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. संघटना महत्त्वाची, बाकी सरकार वगैरे पूरक गोष्टी : मोहन भागवत
आत्मविश्वास वाढवण्यासाठी संघटना महत्त्वाची असते. संघटनेत उद्देश साकार होतो. बाकी सरकार वगैरे या पूरक गोष्टी असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
एबीपी माझाच्या बातमीनुसार, मोहन भागवत हे नाशिक मधल्या चरथ सदन केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
"आमची संघटना जी चालत आली आहे, तिचा एक उद्देश आहे आणि तो संघटेनतच पूर्ण होऊ शकतो. बाकी सरकार वगैरे या गोष्टी पूरक किंवा सहाय्यक असू शकतात," असं भागवत म्हणाले आहेत.
मोहन भागवत हे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
2. महाराष्ट्रात विमानानं येण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक नाही
कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक नसेल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

मात्र अशा प्रवाशांना लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र सोबत आणावं लागेल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
"लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनी आरटी-पीसीआर टेस्ट केली नसेल, तरी त्यांना राज्यात प्रवेश करू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे," असं टोपे यांनी म्हटलं आहे.
3. कावड यात्रा : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि योगी सरकारला नोटीस
उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रेला परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
यासंबंधीच्या याचिकेवर 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
केंद्र सरकारकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतरही उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रा काढण्यास परवानगी दिली आहे. योगी सरकारच्या या निर्णयाची चर्चा होत असून, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतली आहे.

फोटो स्रोत, AFP
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नरिमन यांच्या खंठपीठानं याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रा काढण्यास परवानगी देताना कोरोनासंबंधी सर्व नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
4. महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 11 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (14 जुलै) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लोकमतनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
याचा फायदा 48.34 लाख केंद्रीय कर्मचारी, तसेच 65.26 लाख पेन्शनर व्यक्तींना होईल. त्यापायी केंद्र सरकारचे 38 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
हा निर्णय 1 जुलैपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार आहे.
5. सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळाले स्थायी कमिशन
भारतीय सैन्यातील आणखी 147 महिलांना स्थायी कमिशन (Permanent Commission) प्रदान केले जाणार आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
एकूण 615 अधिकाऱ्यांपैकी 424 महिलांना स्थायी कमिशन देण्यात आले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"प्रशासकीय कारणांमुळे काही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती रोखण्यात आली होती. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारद्वारे दाखल केलेल्या स्पष्टीकरणात्मक याचिकेबाबत स्पष्टता येणं बाकी आहे," असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे.
17 फेब्रुवारी 2020ला सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिला होता. महिलांनाही लष्करात समान संधी द्या, असं न्यायायलानं सरकारला सुनावलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








