चेतन कुमार : ब्राह्मणवादाला आव्हान देणारा हा अभिनेता कोण आहे?

चेतन कुमार

फोटो स्रोत, INSTAGRAM/CHETANAHIMSA

फोटो कॅप्शन, चेतन कुमार
    • Author, इम्रान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कन्नड अभिनेते आणि कार्यकर्ते चेतन कुमार यांची बंगळुरू पोलिसांनी 18 जूनला चौकशी केली. चेतन कुमार यांनी ब्राह्मणवादाविषयी केलेल्या वक्तव्याशी संबंधित हे प्रकरण आहे.

चेतन यांनी ब्राह्मणवादाविषयी वक्तव्य केल्यानंतर वादाला सुरुवात झाली आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

चेतन यांना इतर मागास वर्गातून पाठिंबा मिळाला. असं असलं तरी चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक जण याप्रकरणी गप्प राहिले.

चेतन कुमार यांना चेतन अहिंसा या नावानं ओळखलं जातं. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले.

या व्हीडिओनंतर चेतन यांच्याविरोधात ब्राह्मण डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष आणि आणखी एका संस्थेनं तक्रार दाखल केली.

तसंच एका सामाजिक कार्यकर्तीने परराष्ट्र क्षेत्रीय नोंदणी कार्यालयात तक्रार दाखल करत म्हटलं की, चेतन यांना अमेरिकेला परत पाठवण्यात यावं, कारण ते 'ओवरसीज सिटिझन ऑफ इंडिया' कार्डधारक आहेत आणि त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं होतं, "आम्ही चेतन यांच्यासाठी प्रश्नावली तयार केली होती. या प्रश्नांची त्यांनी खूप दीर्घ उत्तरं दिली आहेत. या प्रश्नांना रेकॉर्ड करणंही गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना उरलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलं आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

चेतन यांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 153-अ आणि 295-अ या कलमांचं उल्लंघन केलं आहे की नाही, याप्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

याचा अर्थ चेतन यांच्यावर धर्म अथवा जातीच्या आधारे वेगवेगळ्या समुदायांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी किंवा धार्मिक भावना भडकावण्यासाठी हेतुपुरस्सर किंवा वाईट हेतूनं काम केल्याचा आरोप आहे.

चेतन कुमार यांनी काय म्हटलं होतं?

चेतन यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हीडिओत म्हटलं होतं की, "हजारो वर्षांपासून ब्राह्मणवादानं बसवेश्वर आणि बुद्धाच्या विचारांना संपवण्याचं काम केलं आहे. 2500 वर्षांपूर्वी बुद्धानं ब्राह्मणवादविरोधात लढाई लढली. बुद्ध विष्णूचा अवतार नाहीये आणि असं म्हणणं खोटं बोलणं आहे. मूर्खपणा आहे.

यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं, "ब्राह्मणवाद स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या भावनेचा स्वीकार करत नाही. आपण ब्राह्मणवादाला मूळापासून उखडायला हवं. सगळेच जण एका समान पद्धतीनं जन्म घेतात, त्यामुळे केवळ ब्राह्मण सर्वोच्च आहेत आणि इतर सगळे अस्पृश्य आहेत, असं म्हणणं निव्वळ मूर्खपणा आहे. हा एक खूप मोठा विश्वासघात आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कन्नड अभिनेते उपेंद्र यांनी कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाविषयी बोलताना चेतन यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.

या कार्यक्रमात फक्त पुरोहितांना बोलावण्यात आलं होतं, असं चेतन यांचं म्हणणं होतं. यामुळे मग त्यांनी उपेंद्र यांच्यावर टीका केली.

दुसरीकडे उपेंद्र यांचं म्हणणं आहे की, आपण नुसतंच जातींविषयी बोलत राहिलो तर जात तशीच टिकून राहील. चेतन यांच्या मते, ब्राह्मणवाद हे असमानतेमागचं मूळ कारण आहे.

या दोन्ही अभिनेत्यांच्या वादानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली आणि मग त्यांचे समर्थकही आपआपसात भिडले.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

ब्राह्मणांवर नव्हे, तर ब्राह्मणवादावर टीका करतो, असं चेतन यांचं म्हणणं आहे. जसं कन्नड चित्रपटसृष्टीत अनेक ब्राह्मण अभिनेते ब्राह्मणवादाचा विरोध करत आले आहेत.

या वक्तव्यानंतर ब्राह्मण डेव्हलपमेंट बोर्डानं त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते गिरीश भारद्वाज यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "चेतन हे अमेरिकी नागरिक आहेत आणि 'ओवरसीज सिटिजन ऑफ इंडिया' कार्डधारक आहेत, हे आम्हाला माहिती नव्हतं. 'ओवरसीज सिटिजन ऑफ इंडिया' कार्डधारक याप्रकारच्या घटनांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत."

चेतन कुमार कोण आहेत?

37 वर्षीय चेतन कुमार यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत.

'आ दिनागलु' चित्रपटाचे दिग्दर्शक के.एम. चैतन्य यांनी बीबीसीला सांगितलं, की चेतन येल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतल्यानंतर भारतात आले तेव्हा चित्रपटासाठी ते नवीन चेहरा होते.

2007मध्ये आलेला हा चित्रपट एक कल्ट चित्रपट समजला जातो.

याशिवाय चेतन यांनी इतर चित्रपटांत काम केलं आहे, पण ते विशेष असं प्रदर्शन करू शकले नाहीत. पण, 2013मध्ये आलेला त्यांचा 'मायना' हा चित्रपट चांगला चालला होता, त्यांचचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन कुमार

फोटो स्रोत, INSTAGRAM/CHETANAHIMSA

फोटो कॅप्शन, चेतन कुमार

महेश बाबू दिग्दर्शक असलेला चेतन यांचा 'अथीरथा' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. याच्यामागे चेतन यांचे राजकीय विचार कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

एकीकडे एक कार्यकर्ते म्हणून चेतन यांची ओळख तयार होत आहे, तर दुसरीकडे चित्रपटांतील त्यांचा सहभाग कमीकमी होत आहे.

दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मंजुनाथ रेड्डी ऊर्फ मंसोरे सांगतात, "चेतन हे एक समर्पित अभिनेते असले तरी यशस्वी नाहीयेत. ते अजूनही 'आ दिनागलु' या चित्रपटासाठीच ओळखले जातात. सध्या ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहेत. ज्या अभिनेत्यासाठी सामाजिक प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात, अशा अभिनेत्याच्या रुपात ते समोर येत आहेत."

चित्रपटसृष्टी आणि इतर सामाजिक मुद्दे

कन्नड चित्रपट क्षेत्रातले मोठे कलाकार सामाजिक मुद्द्यांवर कधीच भूमिका घेत नाहीत हे सर्वश्रूत आहे. ते फक्त कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर विरोध करण्यासाठी पुढे येतात. पण त्याला सुद्धा कारण आहे. तामिळ चित्रपट कलाकार या मुद्द्यावर भूमिका घेतात, या भावनिक मुद्द्यावरून कर्नाटकचा विरोध करतात म्हणून कन्नड कलाकार या मुद्द्यावर पुढे येतात.

अशा परिस्थितीत अभिनेत्यापासून आता सामाजिक कार्यकर्ते झालेले चेतन कुमार आदिवासी लोकांना जंगलातून हटवल्याप्रकरणी कोडगू जिल्ह्यात निदर्शनला बसले. स्थलांतरितांना पर्यायी जागा द्या, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

चेतन यांच्या सध्याच्या ब्राह्मणवादाच्या प्रकरणावरही चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तींपैकी कुणी काही बोलायला तयार नाहीये.

एकानं म्हटलं, "मी याप्रकरणावर भाष्य करू इच्छित नाही." तर दुसरा म्हटला, "त्या मुलाविषयी बोलायला माझ्याकडे काहीच नाहीये." तिसऱ्यानं म्हटलं, "याप्रकारच्या भांडणांमध्ये सहभाही होऊन तो फक्त आपलं अस्तित्व दाखवू पाहत आहे."

चेतन कुमार

फोटो स्रोत, INSTAGRAM/CHETANAHIMSA

फोटो कॅप्शन, चेतन कुमार

मंसोरे सांगतात, "आमच्या व्यवसायात लोक भांडणांमध्ये रस घेत नाहीत. कोणीही अभिनेता आदिवासींचे प्रश्न किंवा Me Too मोहिमेबाबत भूमिका घेणार नाही. या Me Too मोहिमेत श्रुती हरिहरन यांना पाठिंबा दिल्यामुळे लोकांनी चेतनला व्हिलन ठरवलं."

कोडगू येथील निदर्शनादरम्यान चेतन सामाजिक कार्यकर्ता असल्याची माहिती मंसोरे यांनी समजली. सामाजिक प्रश्नांवर चेतन जी चिंता व्यक्त करतात ती वास्तविक असते, असं ते सांगतात.

श्रुती हरिहरन या अभिनेत्रीनं आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी Me Too मोहिमेदरम्यान चित्रपट जगतातील सुप्रसिद्ध अभिनेते अर्जुन सरजा यांच्याविरोधात 'गैरव्यवहार' केल्याचा आरोप केला होता.

त्यावेळी चेतन यांनी 'फिल्म इंडस्ट्री फॉर राइट्स अँड इक्वेलिटी' (एफआयआरआय) नावानं एका मंचाची स्थापना केली होती. हा मंच चित्रपट उद्योगातील लोकांच्या आर्थिक आणि शारीरिक शोषणाच्या प्रकरणांवर काम करतो.

तेव्हापासूनच चित्रपट उद्योगातील लोकांनी चेतन यांना गांभीर्यानं घेणं बंद केलं, असं मंसोरे सांगतात.

श्रुति हरिहरण

फोटो स्रोत, INSTAGRAM/SRUTHI_HARIHARAN22

फोटो कॅप्शन, श्रुति हरिहरण

श्रुती हरिहरन सांगतात, "आपण जे काही करत आहोत त्यामुळे आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल, याची चिंता नसलेली वक्ती म्हणजे चेतन होय. चित्रपट उद्योगात जी माणसं आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत, त्यांना मदत करायचं काम ते करत आहेत. ते फक्त बोलतच नाही, तर करूनही दाखवतात."

चेतन यांना पाठिंबा

मंसोरे आण श्रुती दोघेही चेतन यांच्या ब्राह्मणवादाच्या वक्तव्याचं समर्थन करतात.

मंसोरे म्हणतात, "चेतन यांनी ब्राह्मणांच्या विरोधात काहीच म्हटलेलं नाहीये. त्यांनी ब्राह्मणवादाची गोष्ट केली आहे. या ब्राह्मणवादी संस्कृतीनं चित्रपट उद्योगात पाय पसरले आहेत. त्यांनी केवळ ब्राह्मणवादी मानसिकतेची गोष्ट केली आहे."

मी स्वत: एका ब्राह्मण कुटुंबातून येते, पण अशा काही धार्मिक प्रथा होत्या ज्यांचं पालन केल नाही, असं श्रुती स्पष्टपणे सांगतात.

श्रुती सांगतात, "मी चेतन यांच्याशी सहमत आहे की, ब्राह्मणवाद समानतेचा स्वीकार करत नाही. मासिक पाळीसारख्या प्रश्नांवर तर इथली मानसिकता खूपच पितृसत्ताक आहे. मला नाही वाटतं की त्यांनी कुणाला काही त्रास दिला आहे."

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कविता लंकेश म्हणतात, "चेतन हा फक्त एक गरम डोक्याचा तरुण आहे, ज्याच्यात डावपेच आखण्याची क्षमता कमी आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)