पुणे कोरोना व्हायरस : पुण्यात सोमवारपासून काय सुरू, काय बंद राहणार?

पुणे लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेनं याबाबातचं आदेश पत्रक जारी केलं आहे.

महापालिकेनं जारी केलेले हे आदेश 7 जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील.

पुण्यात सोमवारपासून काय सुरु काय बंद?

  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील.
  • अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. शनिवार रविवार पुर्ण बंद राहतील.
  • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णतः बंद राहतील.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी 4 नंतर शनिवार, रविवार फक्त पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहील.
  • लोकल ट्रेनमध्ये फक्त वैद्यकीय सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.
  • पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
पुणे लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा व कोव्हिड व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • इतर शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • सर्व आउटडोअर स्पोर्टस सर्व दिवस सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील.
  • सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत करता येतील.
  • लग्न समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
  • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा, निवडणुका 50 टक्के उपस्थितीत घेता येतील.
  • पालिका हद्दीतील बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय असलेले बांधकाम सुरू ठेवता येईल. बाहेरुन कामगार येणार असतील तर 4 वाजेपर्यंतच बांधकामास परवानगी राहिल.
पुणे लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

  • कृषी संबंधित दुकाने, बाजार समितीमधील शेत मालाची विक्री हे आठवड्यातील सर्व दिवस 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • ई-कॉमर्स सेवा सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सुरु राहतील.
  • पालिका क्षेत्रात पाच वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 5 नंतर संचारबंदी लागू असेल.
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी एसी वापरता येणार नाही.
  • पीएमपी बसेस आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार, रविवार होम डिलिव्हरी सुरू राहील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)